शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर उपवास ठेवून दिली रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सोमवारी (दि.२) करण्यात येणारे उपोषण उपवासात बदलले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सोमवारी (दि.२) करण्यात येणारे उपोषण उपवासात बदलले. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास पकडून सेवा सुरळीत ठेवल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल यांनी सांगितले.पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट या कायद्यातील जाचक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, डॉक्टरांवरील होणारे हल्ले टाळण्यासाठी कठोर कायद्या व्हावा, एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येणाºया एनएएनटी ही परीक्षा रद्द व्हावी, वैद्यकीय हलगर्जीपणाच्या प्रकरणांत देण्यात येणाºया नुकसानभरपाईच्या रकमेवर योग्य मर्यादा घालण्यात यावी, अशा विविध मागण्या ‘आयएमए’तर्फे करण्यात आल्या आहेत.आयएमए शाखेच्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर्स उपोषण करणार होते. परंतु एका ठिकाणी बसून उपोषण करण्याऐवजी रुग्णालयात रुग्णसेवा देऊन उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आयएमए’तर्फे सकाळी ८.३० वाजता समर्थनगर येथील आयएमए हॉल येथे सभा घेण्यात आली.महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवासाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. रमेश रोहिवाल, ‘आयएमए’चे सचिव डॉ. संतोष रंजलकर, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. वंदना काबरा, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ उज्ज्वला दहीफळे, डॉ. पवन तिवारी, डॉ. प्रशांत सोनवटीकर, डॉ. दत्ता कदम, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. यशवंत गाडे आदी उपस्थित होते.शहरातील तीनशेपेक्षा अधिक डॉक्टरांनी उपवास पकडून सहभाग नोंदविल्याचे डॉ. रंजलकर यांनी सांगितले. रुग्णसेवेवर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे ‘आयएमए’तर्फे सांगण्यात आले.