गंगाखेड : राष्ट्रवादी व कॉँग्रेसची वरिष्ठ पातळीवरून आघाडी निर्माण झाली आहे. अपक्षांसह पंधरा नगरसेवक माझ्यासोबत आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षाचेच काम करावे अन्यथा दुसऱ्या पक्षासोबत जायचे असल्यास त्यांनी राजीनामे द्यावेत, असे इशारा राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला. गंगाखेड नगरपालिका पंधरा दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांनी गाजत आहे. सहलीवरून परत आलेल्या नगरसेवकांत आता वेगळीच खळबळ सुरू झाली आहे. १५ जून रोजी राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे यांंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रे म्हणाले, नगरसेवकांच्या घरी जाऊन आम्ही भेटी घेत आहोत. ते कोणाच्या तरी दडपणाखाली असून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक माझ्यासोबत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत कॉँग्रेसचे ४ नगरसेवक, १ अपक्ष, राकॉँचे नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी प्रल्हाद मुरकुटे, बाळकाका चौधरी, विलास जंगले, राजू सावंत, गोविंद यादव, सय्यद अकबर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)नगरसेवक परतलेयेथील नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे. २९ व ३० मे रोजी दोन्ही गटाकडील नगरसेवक सहलीवर गेले होते. त्यातील काही नगरसेवक परतले आहेत. गंगाखेडच्या राजकारणाला विधानसभेच्या तोंडावर वेगळेच वळण आले आहे. राजकीय दिग्गजांत मोठ्या प्रमाणात शाब्दीक चकमक सुरू असते. नगरसेवक पळवापवळीच्या राजकारणामुळे शहरातील राजकीय चेहरे स्पष्ट होत आहेत.
पक्षाचे काम करा,अन्यथा राजीनामे द्या
By admin | Updated: June 16, 2014 00:13 IST