शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

‘कामे गतीने करा’

By admin | Updated: October 1, 2016 01:22 IST

बीड : सामान्यांची कुठलीही कामे प्रलंबित राहता कामा नये. कामांमध्ये अडचणी असतील तर तसे संबंधितांना कळवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल

बीड : सामान्यांची कुठलीही कामे प्रलंबित राहता कामा नये. कामांमध्ये अडचणी असतील तर तसे संबंधितांना कळवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आ. लक्ष्मण पवार, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे या भागात नुकसान झाले आहे तेथे पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. सर्व स्तरातील अहवाल ३ आॅक्टोबरपर्यंत प्राप्त होणार आहेत. त्यानंतर नुकसान भरपाईच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणातील पाणीसाठा, पीक परिस्थिती व नुकसान भरपाई संबंधीच्या माहितीचे सादरीकरण केले.आ. धोंडे, पवार, देशमुख यांनी विकासाचे विविध मुद्दे उपस्थित केले. रस्ते, पुलांची दुरस्ती हे विषय सर्वाधिक तीव्रतेने उपस्थित झाले. पावसामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचना आमदारांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम, महावितरण व सिंचनांची प्रलंबित कामे हे मुद्देही चर्चेत आले. शिवाय, अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याच्या दृष्टीने उपाय करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)