शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
3
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
4
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
5
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
6
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
7
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
8
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
9
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
10
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
11
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
12
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
13
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
14
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
15
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
16
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
17
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
18
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
19
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
20
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सक्षम करा

By admin | Updated: May 23, 2016 23:57 IST

उस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़

महादेव जानकर : आरक्षणासाठी सरकार सकारात्मकउस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़ आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, ठिबक आणि वीजपुरवठा केला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि आत्महत्या थांबतील असा विश्वास रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला़उस्मानाबाद येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जानकर म्हणाले, आपण इस्राईल देशाचा दौरा करून तेथील जलसंधारण आणि वीजपुरवठ्याची माहिती घेतली आहे़ आता राज्यात फिरून मोठ्या-मध्यम प्रकल्पांची पाहणी करून शासनाला अहवाल देणार आहोत़ कालव्यांमधून प्रकल्पाचे पाणी सोडले तर बाष्पीभवणातून व इतर कारणांनी पाण्याचा अपव्यय होतो़ त्यामुळे शेतकऱ्यांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी ऐवजी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे़ शिवाय शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावाबाबत असलेले निकष बदलणे गरजेचे असून, जिल्ह्यातील नामंजूर झालेले ७६ प्रस्ताव मंजूर व्हावेत, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत़ शिवाय राज्यात सर्वत्र हा निकष लागू व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ वेळोवेळी आरक्षणाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कोणी ना कोणी न्यायालयात गेल्याने तो प्रस्ताव बारगळला आहे़ हे शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आरक्षण मिळावे यासाठी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे़ या सर्वेक्षणाचा अहवाल आपण राज्य-केंद्राकडे सादर करणार असून, कोणीही या अहवालाला आव्हान दिले तर तो अहवाल टिकेल, असाच बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, आश्रुबा कोळेकर, शिवाजी कोळेकर, आण्णा बंडगर आदीची उपस्थिती होती़ दरम्यान, महादेव जानकर यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ पालिका, जिल्हा परिषद स्वबळावरमित्रपक्षांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे मी मंत्रीपद मागणे उचित नाही़ मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे़ दिलेला शब्द पाळला नाही तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील़ शिवाय आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रासपा स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले़