शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट पाहू नका

By admin | Updated: August 10, 2014 01:29 IST

शेतकऱ्यांना रास्तभाव मिळवून देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हिंगोली बाजार समितीला दिला.

हिंगोली : बाजार समितीत उत्पादकांचा माल वाढताच भाव पडतात तेव्हा बाजार समितीने बघ्याची भूमिका घेऊ नये. शिवाय तक्रारीची वाट पाहत बसू नये कारण तक्रार करायला शेतकऱ्यांजवळ वेळ नाही. त्यावेळी स्वत: हस्तक्षेप करून मोजमाप घेवून शेतकऱ्यांना रास्तभाव मिळवून देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हिंगोली बाजार समितीला दिला. हिंगोली कृउबातील टिनशेडच्या उद्घानानंतर डॉ. माने बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. गजानन घुगे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, सचिव डॉ.जब्बार पटेल, प्रशासक डी.एस. हराळ, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी संचालक सुनील पाटील गोरेगावकर, सेनगावचे सभापती नारायण खेडकर, माजी संचालक रामेश्वर शिंदे, प्रतिभा डहाळे, प्रकाशचंद्र सोनी, सतिश विडोळकर, पिपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा, ज्ञानेश्वर मामडे, मनमोहन सोनी, विशेष लेखा परीक्षक काकडे, बुलढाणा कृउबाच्या सचिव वनिता साबळे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना मालानुसार भाव मिळत नाही. मालाची ग्रेडींग होत नसल्यामुळे रास्त भावाचा प्रश्न येत नाही. ही उत्पादकांची पिळवणूक तसेच शोषण होवू नये म्हणून बाजार समितीचा कायदा करण्यात आल्याचे माने म्हणाले. कामकाजाबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ बाजार समित्यांवर येऊन ठेपली आहे. निव्वळ मार्केट फीस गोळा करण्याचे एकच ध्येय बाजार समितीचे नसून व्यापाऱ्यांच्या दप्तरांची तपासणी करा, उत्पादकांना रास्त भाव मिळवून देण्याच्या सूचना डॉ. माने यांनी हिंगोली कृउबा प्रशासनास दिल्या. तत्पूर्वी माजी आ. घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील प्रधान यांनी तर आभार उपनिबंधक अशोक गिरी यांनी मानले. ....यासाठी परवानगी बाजार समित्यांत व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही निर्माण झाल्याने रास्तभाव मिळत नाही. म्हणून वैयक्तिक तसेच खासगी बाजार समित्यांना परवानगी दिली जात आहे. त्यातून व्यापाऱ्यांत स्पर्धा होवून उत्पादकांना चांगला भाव मिळेल तसेच शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल, असा उद्देश आहे. माने यांच्याकडे मागणी२०१०-११ वर्षीचे आर्थिक व्यवहाराचे रेकॉर्ड माहितीच्या अधिकाराखाली मिळविल्याने बाजार समित्याच्या व्यवहारात अफरातफर झाली आहे. त्याची तक्रार केली असता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गोलमाल व दिशाभूल करणारे उत्तर दिले. त्यामुळे या व्यवहाराच्या चौकशीची मागणी देवळा येथील व्यापारी गोपाल ढोणे यांनी डॉ. माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)