शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गायब झालेल्या ‘हायवा’चा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 21:02 IST

वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्याप शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहेत. चोरी गेलेला हायवा परत मिळावा,यासाठी महसूल विभागाने दिलेले पत्र घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्याप शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहेत. चोरी गेलेला हायवा परत मिळावा,यासाठी महसूल विभागाने दिलेले पत्र घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

वाळूज परिसरातील अनधिकृतपणे सुरु असलेल्या वाळू पटट््यावर आठवडाभरापूर्वी महसूल विभागाने छापे टाकले होते. कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०, ई.जी.६७१८) महसूलच्या पथकाने पकडला होता. गंगापूरचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांनी चालक इक्बाल शेख व मालक दीपक वाघमोडे यांच्या नावासह हायवा वाळूज पोलिसांच्या स्वाधीन करत ताबा पावती घेतली होती. वाळूज पोलिसांच्या ताब्यात असताना हा हायवा ठाण्यातून गायब झाला.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पोलिस ठाण्यातील ठाणे अमंलदाराने ठाणे प्रमुखांच्या तोंडी आदेशानुसार हा हायवा ‘लक्ष्मीपुजना’च्या नावाखाली संबधित वाळूमाफियाच्या स्वाधीन केला होता. दरम्यान, दिवाळीचे लक्ष्मीपूजन होऊनही हायवा परत न आल्यामुळे या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती. या प्रकरणाची कुणकुण लागताच वाळूज पोलीस ठाण्यातून हायवा चोरीला गेल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. आता हायवा गायब होऊन आठवडा उलटला तरी हायवाचा शोध लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. महसूल विभागाच्या पत्रामुळे पोलीस प्रशासनाची पंचाईत झाली आहे.

महसूलचे पत्र घेण्यास पोलिसांची टाळाटाळवाळूज पोलीस ठाण्यातून हायवा गायब झाल्याने महसूल विभागही चक्रावून गेला आहे. वाळूसह हायवा चोरी गेल्यामुळे तो पुुन्हा जप्त करुन पुढील आदेशापर्यंत पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवावा, अशा आशयाचे पत्र घेऊन महसूल विभागाचे अधिकारी दोन दिवसांपासून वाळूज पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र पोलीस निरीक्षक ठाण्यात आल्याशिवाय पत्र स्विकारणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने महसूल विभागाचे अधिकारी पत्र घेऊन माघारी गेले आहे. या विषयी तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाळूज पोलिसांकडून पत्र घेण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.