शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’ची चौकशी नको

By admin | Updated: June 16, 2017 00:59 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, ही स्थायी समिती सदस्यांनी केलेली मागणी सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारच्या बैठकीत फेटाळली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, ही स्थायी समिती सदस्यांनी केलेली मागणी सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारच्या बैठकीत फेटाळली. खा.चंद्रकांत खैरे यांनी वरिष्ठ पातळीवर तशी मागणी करावी. मात्र, या योजनेत नेमका काय भ्रष्टाचार झाला आहे, यासाठी आयुक्तांनी त्रयस्थांमार्फत चौकशी करावी, असेही बारवाल यांनी स्पष्ट केले. त्रयस्थांमार्फत केलेल्या चौकशीचा अहवाल सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीसमोर सादर करावा. या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेनंतरच भूमिगतचे काम करणाऱ्या खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चरला बिल अदा करण्यात यावे, असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले. शिवसेना योजनेच्या चौकशीच्या मागणीसाठी आग्रही आहे, तर बारवाल यांनी त्याला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे भाजप सदस्यांनी विरोध केलेला असताना बारवाल यांनी कंत्राटदारावर मेहरबानी का दाखवीत आहेत, असा प्रश्न आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य असल्यानंतरही कंत्राटदाराचे बिल रोखून धरण्याची बारवाल यांची तयारी नव्हती. दहा दिवसांसाठी बिल रोखून धरू, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु सर्वच सदस्यांचा आक्रमक आग्रह पाहता आयुक्तांमार्फत चौकशी अहवाल सादर होऊन त्यास मंजुरी मिळेपर्यंत बिल रोखून धरण्यास त्यांनी मान्यता दिली. गजानन बारवाल स्थायी समितीचे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच आज स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीच्या पूर्वी भाजप सदस्यांनी सभापतींना निवेदन देऊन बैठकीत भूमिगत गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चेची मागणी केली होती.अभियंते मनपाचा पगार घेऊन कंत्राटदाराची वकिली करतात. जनतेकडून सेवरेज कर वसूल करून त्यातून मनपाचा वाटा भरून ही योजना चालविण्यात येत आहे. आतापर्यंत या ठेकेदाराने (८० टक्के ) २३२ कोटी रुपये काढून घेतले असून, आता तो राहिलेल्या २० टक्क्यांकरिता थांबायला तयार नाही. त्याला काम अर्धवट टाकून पळून जायचे आहे. त्यामुळे एकूणच योजनेतील भ्रष्टाचाराची तांत्रिक आणि प्रशासकीय तपासणी करावी. सीबीआयमार्फत चौकशी करावी. चौकशीचा अहवाल येईल, तोपर्यंत त्याचे बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. मंजूर केलेल्या डीपीआरप्रमाणे योजनेचे काम झाले नाही. पीएमसी फोरस्ट्रेट व मनपाचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी योग्य देखरेख न केल्याने योजना फेल गेल्याचा आरोप त्यांनी केला.