शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

तंगड्या ओढणाऱ्यांना संधी नको...

By admin | Updated: August 27, 2014 00:40 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती झाल्या.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती झाल्या. एकमेकांच्या तंगड्या ओढणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका, अशा तक्रारी काही उमेदवारांनी नेत्यांजवळ केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या मुलाखतींचा निकाल ३० आॅगस्टपर्यंत लागण्याची इच्छुकांना अपेक्षा आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर.आर. पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, युवक काँग्रेसचे उमेश पाटील, नीलेश राऊत आदींच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यासाठी सुमारे दीड तास वेळ देण्यात आला. नऊ मतदारसंघांतील सर्व इच्छुकांच्या मुलाखती यावेळी झाल्या. अनेक उमेदवारांनी यावेळी एकोप्याने लढल्यास जिल्ह्यात आपल्या जागा वाढू शकतात, असे निदर्शनास आणले, तर काहींनी मागील निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवारांचे पाय ओढण्याचे काम केले. त्यामुळे पक्षाला दोन जागा गमवाव्या लागल्या, असे मत मांडले. पाय ओढणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी काही इच्छुकांनी केली. विशेष करून गंगापूर आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघाबाबत ही मते मांडली गेली. उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणाले की, मुलाखती अतिशय समंजस वातावरणात पार पडल्या. काल बिहारमधील पोटनिवडणुकीचे वारे आणि कार्यकर्त्यांतील समंजसपणा यामुळे यंदा काँग्रेस आघाडीसाठी वातावरण पोषकच बनले आहे. फौजिया खान यांची अनुपस्थितीऔरंगाबाद मध्यमधून राज्यमंत्री फौजिया खान इच्छुक असल्याचे काही दिवसांपासून चर्चिले जात होते. मात्र, मंगळवारी झालेल्या मुलाखतीच्या वेळी त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे या मतदारसंघातील इच्छुकांना वाटत आहे. प्रत्येकाला तीन- चार मिनिटेप्रत्येक इच्छुकाने आपल्या उमेदवारीबाबतचे प्रोफाईल नेत्यांसमोर सादर केले. मतदारसंघाची पार्श्वभूमी, पक्षसंघटनांसाठी केलेले प्रयत्न त्याचबरोबर भविष्यात मतदारसंघात करणार असलेले काम याबाबतची माहिती दिली.काही उमेदवारांनी ‘दृष्टिक्षेप २०१४’ अशा आशयाचे व्हिजन डॉक्युमेंटही तयार केले होते. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी दीड तासाची वेळ देण्यात आली. यामध्ये प्रत्येक इच्छुकाच्या वाट्याला तीन ते चार मिनिटे वेळ आला. औरंगाबाद मध्य मतदारसंघ विनोद पाटील, अब्दुल कदीर मौलाना, मनमोहनसिंग ओबेरॉय, मुश्ताक अहमद, डॉ. गफ्फार कादरी, कमाल फारुकी, बादशाह पटेल, मेहराज पटेल, मिलिंद पाटील, अफसर खान, लक्ष्मण औताडे, मनोज घोडके, आशाताई धोंड, रंगनाथ काळे, अ. सिकंदर अ. साजेद, सुरजिसिंग खुंगर, जुबेर मोतीवाला. गंगापूर- खुलताबादकृष्णा पाटील डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण, राजू वरकड, हरिभाऊ ढवण, संपत छाजेड, अनिलभय्या जाधव, अ‍ॅड. कैसरोद्दीन, सूर्यकांत गरड, शेख नासेर, माजी आमदार कैलास पाटील औरंगाबाद पूर्वअभिजित देशमुख, सलीम पटेल वाहेगावकर, डॉ. बाळासाहेब पवार, मुश्ताक अहमद, रुख्मिणीबाई शिंदे, विश्वनाथ स्वामी. औरंगाबाद पश्चिमविनोद बनकर, शैलेंद्र देहाडे, गाझी सादोद्दीन, संदीप शिरसाठ, विजय वाहूळकन्नड मतदारसंघउदयसिंग राजपूत, मारुती राठोड, रंगुबाई पुंडलिक काजे, डॉ. संजय गव्हाणेपैठण मतदारसंघआ. संजय वाघचौरे, तुषार शिसोदे, उदय पवार, अप्पासाहेब निर्मळ, कांतराव औटे,अनिल जाधव, रंजना कडू पाटीलसिल्लोड मतदारसंघसुधाकर पाटीलवैजापूरभाऊसाहेब पाटील चिकटगावकरफुलंब्री मतदारसंघनितीन शंकरराव देशमुख, पांडुरंग तांगडे पाटील, अनुराधा चव्हाण, आनंदा ढोके.