शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पावर असलेल्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या पाणी वापरासाठी निर्माण झालेल्या पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीस सभासदांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पाटबंधारे विभागास तिसऱ्यांदा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागला असल्याने पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीची ‘हॅट्ट्रीक’झाली आहे़ घरणी मध्यम प्रकल्पावर असलेल्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा़ त्याचबरोबर कालव्याची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करता यावी, यासाठी विठाई पाणी वापर संस्था, विठ्ठल पाणी वापर संस्था आदी आठ संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत़ या पाणी वापर संस्थेच्या सभासदांचा कार्यकाल संपल्याने डिसेंबर २०१३ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी कोणीही नामाकंन दाखल केले नाही़ त्यामुळे पुन्हा माहे फेब्रुवारी २०१४ मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक प्रक्रिया पाटबंधारे खात्याने जाहीर केली़ तेव्हा सुद्धा फक्त १२ सभासदांनी निवडणुकीत भाग घेतला आणि बिनविरोध निवडून आले़ परंतु, उर्वरित जवळपास ३२ जागांसाठी कोणीही नामांकन दाखल केले नसल्याने १६ जून रोजी तिसऱ्यांदा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने या निवडणुकीची हॅट्ट्रीक झाली आहे़(वार्ताहर)असा आहे कार्यक्रम़़़या निवडणुकीबाबत शाखाधिकारी सिंदफळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ३० जून नामांकनाची अंतिम तारीख असून १ जुलै रोजी छाननी, ६ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम यादी आणि १६ जुलैला ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे़ तर १७ जुलै रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे़ पाणीवापर संस्थांकडून निवडणुकीसाठी उत्साह दाखविण्यात येत नसल्याने तिसऱ्यांदा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़
‘पाणी’ संस्थांकडून प्रतिसाद मिळेना !
By admin | Updated: July 2, 2014 00:20 IST