शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

गाडीने होऊ नये, जीवनाची बिघाडी...!

By admin | Updated: June 9, 2014 00:07 IST

बीड :चार दिवसांपूर्वी भाजपाचे नेते व केंंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघातील निधन झाले़

बीड :चार दिवसांपूर्वी भाजपाचे नेते व केंंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघातील निधन झाले़ मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली़ त्या पार्श्वभूमीवर सीटबेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या ड्रायव्हरला त्यासंबंधीचे कितपत भान असते, येथपासून ते नेतेही किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत़़़ त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणूऩ़़!नेत्यांना काही सूचना..नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास पिलंब टाळता येऊ शकतोकार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढविल्याने ऐन वेळी पळापळ करावी लागतेआपला चालक वेळेत जेवला आहे का? त्याच्या प्रकृतीला काही त्रास आहे का? हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीचकायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूट्या लावणे केेंव्हाही सोयीस्करआपण नेते आहोत म्हणून आपण नियम तोडायचे़़़ असे होता कामा नये़ नियम पाळल्यास दुर्घटना टाळता येऊ शकतातरोजी आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन स्वत:ला घालून घ्यायला हवेनिर्व्यसनी चालकांमुळे टळू शकतात अपघातमाझ्याकडे तीन वाहनचालक आहेत़ वाहनात बसण्यापूर्वीच मी चालकाच्या जेवणापासून ते तब्येतीपर्यंची चौकशी करतो़ कितीही घाई असेल तर चालकाच्या जेवणाची विचारपूस करतो़ वाहन शक्यतो नियंत्रणातच असते; परंतु कधीकधी वेळेत पोहोचायचे असल्याने वाहन वेगात चालवावे लागते़ चालक निर्व्यसनी असतील तर अपघात शक्यतो होत नाहीत़ हायवेला आम्ही शक्यतो बेल्टचा वापर करुनच प्रवास करतो, अशी प्रतिक्रिया आ. बदामराव पंडित यांनी व्यक्त केली.ही काळजी घ्यावेगाचे भान राखा़ कायद्याने हलक्या मोटारगाडीवर वेगाचे बंधन नसले तरी सुरक्षिततेसाठी वेग मर्यादित ठेवागाडीत मागे व पुढे बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावले पाहिजेतचालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी केली पाहिजे़ जरा सुद्ध संशय आला तर दुर्लक्ष न करता मॅकेनिकला बोलावून दुरुस्ती करुन घ्यावी़वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावेमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यातील वाहनांकडे लहान मुले कुतूहलाने पाहतात़ त्यामुळे कोणी आडवे येत नाही ना याची काळजी घ्यावीखराब रस्ते व वळणाच्या ठिकाणी वाहने सावकाश चालवावीत़सीटबेल्टप्रकरणी कारवाईगतवर्षात सीट बेल्ट न वापरल्याप्रकरणी १२० कारवाया करण्यात आल्या़ एकूण १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलागत महिन्यात एकूण ३४ जणांवर सीटबेल्ट न वापरले म्हणून कारवाईचा बडगा उगारण्यात आला़ साडेतीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहेसीट बेल्ट वापरण्याकडे वाहनचालक व प्रवासी दोघेही दुर्लक्षच करतातसीट बेल्ट न वापरल्यास मोटार वाहन कायदा कलम १३८ (३)/१७७ नुसार कारवाई होतेएअरबॅगसारख्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा वापर करुन जीव वाचवता येऊ शकतो़ पोलिसांच्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत़वेळेत घटनास्थळ गाठण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यतादोन वाहनांसाठी तीन चालक असावेत असा खात्याचा नियम आहे; परंतु कामाच्या वाढत्या ताणाचा विचार केला तर एका वाहनासाठी किमान एक चालक असावाखराब रस्त्यांमुळे वाहनांचे आयुर्मानही होते कमी४संकलन: संजय तिपालेवाहन चालविताना चालकांनी सतर्क असले पाहिजे़ कुठल्याही क्षणी वाहनासमोर कोणी आडवे आले तर गाडी ‘कंट्रोल’ करता आली पाहिजे़ चालकाबरोबरच मागे बसणाऱ्यांनीही सीटबेल्ट वापरावा़ व्हीआयपींनी बेल्टबाबत कंटाळा करु नये़ सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाया सुरु आहेत़ आणखी कारवाया करण्यात येतील़- एम़ बी़ रायबानमोटार वाहन निरीक्षक, बीड़वाहनचालकांच्या हाती वाहनातील सर्वांचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे वाहनचालक ‘फिट’ तसेच प्रशिक्षीतच असावा. वाहतूक नियम पाळले तर खूप कमी अपघात होतात. व्हीआयपींच्या वाहनचालकांची कायम क सरत होते. त्यामुळे दोन ड्रायव्हर घेतले पाहिजेत. आळीपाळीने ड्रायव्हर सोबत ठेवले तर ते चांगल्या प्रकारे ड्रायव्हींग करु शकतात. वेगाने वाहने चालविणे टाळले पाहिजे.- अनिल थोरात, संचालक माऊली मोटार ड्रायव्हिंग स्कूल,बीडवाहतूक नियम डावलणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो़ वाहनांची नियमित तपासणी होते़ परवाना नसताना वाहन चालविणाऱ्यांची संख्या जास्त आहे़ अशा वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो़ बेल्ट न वापरणाऱ्या वाहनांविरुद्धही कारवाई सुरु आहे़ वाहनचालकांकडून केवळ दंड वसूल केला जातो असे नाही तर त्यांना परिणामाची जाणीव करुन दिली जाते़ - एस़ बी़ पठाण, फौजदार, महामार्ग पोलीस, मांजरसुंबा