शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आली दिवाळी; बाजार फुलला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:38 IST

अवघ्या दोन दिवसांवर आलेला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. यामुळे बीडच्या बाजारपेठेला ‘अच्छे दिन’ आले असून, बाजार फुलला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने ब-यापैकी हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. यामुळे बीडच्या बाजारपेठेला ‘अच्छे दिन’ आले असून, बाजार फुलला आहे.या सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी वातावरण असते. घराघरात पणत्यांच्या उजेडाने आनंद आणखी द्विगुणित होतो. दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी बीडच्या बाजारपेठेत सर्वत्र गर्दी दिसत आहे. शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली असली तरी रविवारी सूर्यदर्शन झाल्याने सकाळी १० वाजल्यापासूनच सुभाष रोड, माळीवेस, कारंजा, भाजी मंडई, स्टेडियम कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी दिसून आली. छोट्या-मोठ्या हातगाड्यांसह मोठमोठी दुकाने गि-हाईकांच्या गर्दीने फुलले आहेत.दिवाळीनिमित्त अंगण सजविण्यासाठी विविधरंगी रांगोळ्यांची मागणी असते. यंदा १० टनापेक्षा जास्त रांगोळी बीडमध्ये आली असून, किरकोळ विक्रेत्यांचे हातगाडे शहरातील बाजारपेठेसह विविध भागांत लागले आहेत. त्याचबरोबर पूजा साहित्याला वाढती मागणी असून, सुगंधित लक्झरी अगरबत्तीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. २४ तास, ४० तास वातावरण सुंगधित करणारी उदबत्तीेदेखील आकर्षण ठरत आहे.लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारे अत्तर, तसेच विविध फ्लेवरचे स्प्रे, डिओची खरेदीही ग्राहक करीत आहेत. आकाशकंदिल, आकर्षक नक्षीकाम असलेल्या विविध आकारातील पणत्या बाजारात उपलब्ध असून, चौकशी करून ग्राहक खरेदी करीत आहेत.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभाग व व्यापा-यांनी समन्वय राखून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणा-या ग्राहकांच्या वाहनांसाठी लगत परिसरातील मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास वाहनकोंडी होणार नाही, अशी सूचनाही नागरिकांनी केली आहे.