शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पीटलाइनवरून मंत्र्यांमध्ये दुफळी? मागणी औरंगाबादची, दिले जालन्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 08:38 IST

डाॅ. कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर दानवेदेखील औरंगाबादेत बैठक घेण्यासाठी सरसावले आणि औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रश्नांवर बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क       औरंगाबाद : जालन्याला पीटलाइन करण्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  डॉ. भागवत कराड यांनी घेतला. त्यामुळे रेल्वेच्या पीटलाइनवरून दोन मंत्र्यांतील आणि भाजपतील दुफळी समोर आल्याची चर्चा सुरू आहे.

डाॅ. कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर दानवेदेखील औरंगाबादेत बैठक घेण्यासाठी सरसावले आणि औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रश्नांवर बैठक झाली. द. म. रेल्वेचे नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विभागातील लोकप्रतिनिधींची नांदेड येथे बैठक होते. मात्र, अनेक वर्षांनंतर औरंगाबादेत रेल्वेची बैठक झाली.

याच बैठकीत दानवे यांनी पीटलाइनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती. या सगळ्यानंतर रविवारी दानवे यांनी पीटलाइन जालन्यात करण्याची घोषणा केली. जालन्यात म्हणजे मराठवाड्यात पीटलाइन होत आहे, ही आनंदाची बाब आहे; पण औरंगाबादेतही पीटलाइन केली जावी, अशी मागणी केली जाईल, असे डाॅ. भागवत कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.   

पीटलाइन पुन्हा औरंगाबादला आणणार? डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत  ‘पीटलाइनसाठी प्रस्ताव पाठवा, पुढे मी पाहतो’, अशी डाॅ. कराड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केली होती. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही त्यांनी पीटलाइनची मागणी केली होती. पीटलाइन जालन्याला करण्याची घोषणा झाली असली तरी डाॅ. कराड यांच्या मागणीमुळे ही पीटलाइन जालन्यात होते की औरंगाबादला, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

रेल्वेचे हेही प्रश्न ‘जैसे थे’nमाॅडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळलेला.nशिवाजीनगर भुयारी मार्गाची प्रतीक्षा.nरोटेगाव ते कोपरगाव रेल्वे मार्ग रेंगाळलेला.nऔरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग.