शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून धोकादायक तारांचे जाळे

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे जोडणीसाठीची संपूर्ण रक्कम घेऊन त्यासाठी खांबांऐवजी अक्षरश: लाकडी काड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जिविताला हानी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून वीज कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. घरगुती वीज जोडणीसाठी १६०० ते २१०० रुपये आणि व्यावसायिक वीज जोडणीसाठी २६०० रुपये शुल्क आकारले जाणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुतीसाठी ३ ते ४५०० रुपये आणि व्यावसायिकसाठी ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे जोडणीसाठी वायर आणि केबल महावितरणकडूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ऐनवेळी लाईनमनमार्फत ‘सध्या आमच्याकडे केबल नाही, केबल बाहेरून आणावे लागेल. वायरही उपलब्ध नाही, वायर कमी आहे’ अशी कारणे सांगून त्यासाठीचे पैसे स्वतंत्र मागितले जातात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे खाजगीकरणाद्वारे कंपनीत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा पातळीवर वीज जोडणीच्या कामासाठीही टेंडर काढले जाते. ज्या एजन्सीला जोडणीचे काम दिले, त्या एजन्सीमार्फतच हे काम होण्याऐवजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फतच ही कामे केली जातात. त्यामुळे खांबांच्या वापराऐवजी चक्क लाकडी काड्यांचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी झालेला आहे. जुना जालन्यातील योगेश्वरी कॉलनी भागात लोकांच्या जिविताला हानी होईल, अशाप्रकारे जोडणीसाठी वायर टाकण्यात आलेले आहेत. शास्त्री मोहल्ला भागात वायर आणि विद्युत ताराही लोंबकळत आहे. नूतन वसाहत, भाजीमंडई परिसर, संजयनगर, नीळकंठ कॉलनी, दु:खीनगर, देहेडकरवाडी परिसर, काद्राबाद परिसर, रामनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर, अलंकार परिसर, रेल्वेस्टेशन रोड परिसर, मंठा रोड परिसर इत्यादी भागात लोंबकळणारे वायर, विद्युत तारा आढळतात. हे सर्व प्रकार सुरू असताना महावितरणचे स्थानिक अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करून कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार करत असल्याने सर्वसामान्य लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे अशाप्रकारे नियमबाह्य कामे होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य वीज ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकारही होत आहेत. वीज दुरूस्तीसंबंधीचे अनेक अर्ज महावितरणकडे दाखल झालेले आहेत. मात्र त्यामध्ये मोजक्या ग्राहकांकडेच दुरूस्ती झालेली आहे. अनेक अर्ज अद्यापही पडून असल्याचे समजते.ग्राहकांनी याबाबत विचारणा केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविण्याचा नवा फंडाच सुरू झालेला आहे. (प्रतिनिधी)