शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा ८०़८९ टक्के निकाल

By admin | Updated: June 13, 2017 23:39 IST

परभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २९ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २९ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार ८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची जिल्ह्याची टक्केवारी ८०.८९ टक्के एवढी आहे. इतर जिल्ह्यांचा निकाल पहाता परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात शेवटच्या स्थानावर राहिला आहे. विशेष म्हणजे,गतवर्षीही जिल्हा शेवटच्याच स्थानावर होता. यावर्षी परभणी जिल्ह्यातील ४ हजार ५८२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ८ हजार ५२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ८ हजार ४०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आणि २ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तालुकानिहाय निकालामध्ये जिंतूर तालुक्याने बाजी मारली आहे. जिंतूर तालुक्याचा निकाल ८६.३८ टक्के लागला असून गंगाखेड तालुक्याचा ८३.१० टक्के, परभणी तालुक्याचा ८१.१० टक्के, सेलू तालुक्याचा ८०.७४ टक्के, पाथरी तालुक्याचा ७९.५० टक्के, पूर्णा तालुक्याचा ७९.३६ टक्के, पालम तालुक्याचा ७९.२६ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ७५.८४ टक्के आणि मानवत तालुक्याचा निकाल ७०.२५ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालामध्ये यावर्षी समाधानकारक वाढ झाली आहे़ मागील वर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल ७७़८० टक्के निकाल लागला होता़ यावर्षी १० टक्क्यांनी निकाल वाढला आहे़ दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला़ त्यानंतर परभणी शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती़ परभणी जिल्ह्यात १५ जून पासून शाळा सुरू होणार आहेत़ सध्या शाळांना सुट्या असून, यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला़