शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

विभागातील लसीकरणाचे नियोजन जिल्हानिहाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST

विसावाची केली साफसफाई औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन वर्षांपासून बंद असलेले ‘विसावा’ उपाहारगृह खंडहरप्रमाणे झाले होते. तेथे तळीरामांचा ...

विसावाची केली साफसफाई

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन वर्षांपासून बंद असलेले ‘विसावा’ उपाहारगृह खंडहरप्रमाणे झाले होते. तेथे तळीरामांचा ‘विसावा’ वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे पूर्णत: साफसफाई करून घेतली. तेथील कचरा, रिकाम्या बाटल्यांसह झुडपांची कटछाट करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा

औरंगाबाद : केंद्रीय पथकाने २१ आणि २२ डिसेंबर २०२० रोजी जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पथक जाऊन दोन आठवडे होत आले आहेत, अद्याप दुसऱ्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

विविध विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाईसह पश्चिम मतदारसंघातील विविध वॉर्डांत सुविधांसाठी निधीची मागणी नगर विकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी दिला असून, आमदार संजय शिरसाट यांनी निधी मागणीसाठी पत्र दिले होते. या निधीतून सातारा वाॅॅर्ड क्र. ११५, देवळाई वाॅर्ड क्र. ११४, मिटमिटा वाॅर्ड क्र. ८, क्रांती चौक वाॅर्ड क्र. ७२, वाॅर्ड क्र. ७० पद‌्मपुरा, वाॅर्ड क्र. ९२ विजयनगर, वाॅर्ड क्र. १०८, १०५, ७३, ७६ व ९९ जयविश्वभारती कॉलनी, वाॅर्ड क्र. १०७ विटखेडामध्ये रस्त्यासह विविध कामे करण्यात येणार आहेत.

दर्पण उद्यान स्वच्छ करण्याची मागणी

औरंगाबाद : एन-४ मधील दर्पण उद्यानातील झाडे वाढली आहेत. तसेच जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पालापाचोळ्याचा कचरा साचला आहे. उद्यानातील मैदानाच्या आतही झाडांच्या फांद्या आणून टाकलेल्या आहेत. उद्यानाची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुभाजकातील झाडांना पाणीपुरवठा करा

औरंगाबाद : गजानन मंदिर ते पुंडलिकनगरमार्गे जय भवानीनगर या रस्त्यावरील दुभाजकांमध्ये गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्यात वृक्षांना बहर आला. परंतु मागील काही दिवसांपासून वृक्षांना पाणीपुरवठा करणे मनपाने बंद केले आहे. त्यामुळे झाडे वाळू लागली आहेत. वृक्षांना पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मराठवाड्यात ढगाळ वातावरण

औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी थंड, तर दुपारनंतर थोडे दमट वातावरण राहिले. तसेच सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विभागीय आयुक्तालयातील आपत्ती कक्षाने विभागातील वातावरणाची माहिती जाणून घेतली.

रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांंत भीती

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या व रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना एकटे पाहून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल हिसकावून मारहाण करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रीनबेल्ट रिक्षाचालकांचे अतिक्रमण

औरंगाबाद : सिडको बसस्थानकासमोरील ग्रीनबेल्टसाठी राखीव असलेल्या जागेमध्ये ग्रीनबेल्टमध्ये अनधिकृतपणे रिक्षा स्टॅण्ड सुरू झाले आहे. बसला स्थानकात वळताना या रिक्षांमुळे प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो. रिक्षाचालकांना काही अंतरावर उभे राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

लोककला, पथनाट्य पथकांना आवाहन

औरंगाबाद : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. याबाबत अनुभवी संस्थांनी अर्ज भरून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे २१ जानेवारीपर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.