शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: March 18, 2017 00:02 IST

लातूर :दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री निलंगा व औसा तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरूड व एकुर्गा परिसरात अवकाळी पावसाने झोपडले़

लातूर : लातूर जिल्ह्यात बुधवारी लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी व गारपिटीने कहर केला होता़ दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री निलंगा व औसा तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरूड व एकुर्गा परिसरात अवकाळी पावसाने झोपडले़ यामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़औसा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री नागरसोगा, दापेगाव, तुंगी (बु़), तुंगी (खु़), गाढवेवाडी, जवळगा, पोमादेवी इ. गावांत अवकाळी पाऊस झाला़ तर निलंगा तालुक्यात केळगाव, औराद शहाजानी येथे अवकाळी पाऊस व गारपीट झाली़ औराद शहाजानी महसूल मंडळात गेल्या ४८ तासांत २५ मिमी पाऊस झाला आहे़ शुक्रवारी मध्यरात्री २़३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले़ निलंगा तालुक्यातील मुदगड येथे वीज पडल्याने गुंडा नरसा रेड्डी यांचा बैल जागीच ठार झाला़ तर औसा तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे ११ जण जखमी झाले आहेत़ शिवाय, आठ जणावरे दगावल्याचे वृत्त आहे़ पहिल्या दिवशी बुधवारी झालेल्या अवकाळी पावसात औसा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते़ नांदुर्गा, भेटा, भादा आदी गावांना अवकाळीचा फटका बसला़ जवळपास २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली़ शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा नागरसोगा, दापेगाव, तुंगी खु़, तुंगी बु़ परिसरात पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ लातूर तालुक्यातील एकुर्गा, मुरूड, काळे बोरगाव, शिराळा आदी परिसरात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असून, एकुर्गा शिवारातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे़ सलग दोन दिवस पाऊस झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी इ. रबी पिकांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे़ हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे़ दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून महसूल व कृषी विभागाच्या वतीने भिसे वाघोली, गाधवड, जोडजवळा, मुरूड परिसरात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे़ पहिल्या दिवशी तहसीलदार संजय वारकड यांनी भिसे वाघोली येथील नुकसानीची पाहणी केली असून, आता मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकाच्या समितीमार्फत पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ आठ दिवसात या समितीला प्रत्येक गावाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़