शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड निलंबित

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

हिंगोली : खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ येथे तहसीलदार पदी कार्यरत असताना खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा येथे २००८ मध्ये गावातील लोकसंख्या ५५० असताना १ हजार ९ दाखवून खोट्या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या. गावामध्ये नसणारे व्यक्ती, अविवाहित व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी, एकाच कुटुंबातील त्याच- त्या व्यक्तीची नावे, मयत व्यक्ती आदींच्या नावे या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या. या शिधापत्रिकानुसार रेशनचे धान्य व रॉकेलचे वाटप करण्यात आले. या बाबत येथील ग्रामस्थ विजय विठ्ठलराव थोरात यांनी तक्रार केली होती. त्यामध्ये तलाठी विनोद गादेकर यांनी याद्या तयार केल्या. रेशन दुकानदार ज्ञानोबा सखाराम थोरात यांनी रेशनचे धान्य वाटल्याचे दाखविले. या याद्यांना तत्कालीन तहसीलदार अभिमन्यू बोधवड व नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग केला व याद्यांना मंजुरी दिली. यामुळे शासनाची व जनतेची फसवणूक झाली, असेही तक्रारीत म्हटले होते. या बाबत १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याने तक्रारदार विजय थोरात यांनी औंढा येथील न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तहसीलदार अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार राजेश लांडगे, तलाठी विनोद गादेकर व रेशन दुकानदार ज्ञानोबा थोरात या चौघांवर कळमनुरी येथील पोलिस ठाण्यात ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना तात्पुरता जामिनही मिळाला होता. हे प्रकरण राज्य शासनाकडे आल्यामुळे विभागीय आयुक्त संजिव जयस्वाल यांनी तत्कालीन तहसीलदार व सध्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी कार्यरत असलेले अभिमन्यू बोधवड यांना शासनाची व जनतेची फसवणूक करून कर्तव्यात कसून केल्याने व शासकीय कामात त्यांच्या पदाशी, कर्तव्याशी नितांत सचोटी ठेवली नसल्याने त्यांना निलंबित केल्याचे आदेश ९ जुलै रोजी काढले. हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास १० जुलै रोजी पाप्त झाले. या आदेशात बोधवड यांचा पदभार विशेष भूसंपादन अधिकारी बी. एल. गिरी यांच्याकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)न्यायालयाने अटकपुर्व जामिन फेटाळलाया प्रकरणातील चारही आरोपींना यापुर्वी तात्पुरता जामिन मिळाला होता. गुरूवारी या प्रकरणी अटकपुर्व जामिनासाठी आरोपींच्या वतीने अर्ज करण्यात आल्यानंतर वसमत येथील न्यायालयाने अर्ज फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड. हरिष मुरक्या यांनी दिली. त्यामुळे चारही आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.औंढा तालुक्यातील गढाळा येथील प्रकरणऔंढा नागनाथ येथे तहसीलदारपदी कार्यरत असताना बोधवड यांनी गढाळा येथील लोकसंख्या ५५० असताना १ हजार ९ रेशनकार्डना दिली होती मंजुरी.लहान मुले, विद्यार्थी, अविवाहित व्यक्ती, मयत व्यक्ती, इतर गावांमधील व्यक्ती आदींच्या नावे देण्यात आले होते रेशनकार्ड.बनावट रेशनकार्डवर रेशन दुकानदारांकडून धान्य व रॉकेलचे वितरण करण्यात आले असल्याची तक्रार.औंढा नागनाथ येथील न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बोधवड यांच्यासह चार जणांवर कळमनुरी पोलिसांत दाखल झाला होता गुन्हा.गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मंजुर.काही दिवसांपुर्वीच बोधवड यांची जालना येथे बदली झाल्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेवून बदलीला मिळविली होती स्थगिती.विभागीय आयुक्तांनी बोधवड यांना जालना येथे रुजू होण्याचे दिले होते आदेश.