औरंगाबाद : रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच मागील २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ०.८२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत यंदाच्या मान्सूनमध्ये एकूण सरासरी ६३.३२ मि. मी. पाऊस झाला आहे. शहर व परिसरात रविवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६ नंतर मात्र वातावरणाचा नूर पालटला. हवेत गारवा निर्माण होऊन काही भागांत भुरभुर पाऊस झाला. २६ जून रोजी सकाळी ८.३० पर्यंत जिल्ह्यात दखल घेण्याजोग्या पावसाची नोंद झाली नाही. मागील वर्षी २६ जूनपर्यंत १७१.२५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २६ जूनपर्यंत किमान ११२.९६ मि. मी. पावसाची नोंद होणे अपेक्षित होते; परंतु तेवढा पाऊस जून महिना संपत आला तरी झालेला नाही. ६२.५१ मि. मी. पावसाची नोंद २६ जूनच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेली आहे. ५९ मि. मी. इतक्या पावसाचा गॅप पावसाळा सुरू झाल्यापासून निर्माण झालेला आहे. शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत झालेला पाऊस हा ९.३८ टक्के आहे. ६७५.४६ मि. मी. जिल्ह्यातील पावसाची सरासरी आहे.
जिल्ह्यात फक्त ९.३८ % पाऊस
By admin | Updated: June 27, 2016 01:02 IST