शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या !

By admin | Updated: February 23, 2016 00:44 IST

लातूर : जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने करण्यात येतात. मात्र लातूर जिल्हा नियोजन समितीवर

लातूर : जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने करण्यात येतात. मात्र लातूर जिल्हा नियोजन समितीवर गेल्या वर्षभरापासून नियुक्त्या रखडल्या आहेत. अशासकीय सदस्यांची मर्यादा १२ असताना १३ जणांची नावे पालकमंत्र्यांकडून दिल्यामुळे राज्य शासनाच्या नियोजन विभागाने सुधारित नावे देण्याचे कळविले आहे.नवे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांकडे नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यत्वासाठी नावे दिली आहेत. या नावांच्या यादीवर पालकमंत्र्यांची स्वाक्षरीही झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीत अशासकीय सदस्यांची मर्यादा १२ आहे. परंतु, पालकमंत्र्यांनी दिलेल्या यादीवर १३ जणांची नावे आहेत. या १३ जणांच्या यादीतील एकाचे नाव कमी करावे, अशी सूचना राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून पालकमंत्र्यांना दिली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेतून २४, नागरी भागातून ८ त्यामध्ये लातूर मनपाचे ५ व ३ सदस्य नगरपालिकांतील आहेत. असे एकूण ३२ सदस्य नियोजन समितीवर आहेत. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांचा समावेश या समितीत असतो. शिवाय, वैज्ञानिक विकास महामंडळाचा शासन नियुक्त सदस्यही या समितीत कार्यरत आहे. याशिवाय १२ अशासकीय सदस्य पालकमंत्र्यांच्या शिफारशीने निवडले जातात. परंतु, गेल्या वर्षभरापासून अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीमुळे रखडल्या होत्या. आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीने राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे अशासकीय सदस्यांची यादी गेली आहे. परंतु, या यादीमध्ये मर्यादेपेक्षा एक नाव जास्त आहे. या यादीतील एक नाव कमी करून फेरयादी पाठवावी, असे राज्य नियोजन विभागाकडून पालकमंत्र्यांना कळविले असल्याचे समजते. (प्रतिनिधी)