शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. आरोग्य विभागाला हवेत २५० कोटी

By admin | Updated: October 4, 2016 00:49 IST

औरंगाबाद : ग्रामीण आरोग्य सेवा गतिमान व अद्ययावत करण्यासाठी नवीन २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९४ उपकेंद्रे, आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण केंद्र,

औरंगाबाद : ग्रामीण आरोग्य सेवा गतिमान व अद्ययावत करण्यासाठी नवीन २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९४ उपकेंद्रे, आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह उभारण्याबरोबरच अन्य काही उपक्रम राबविण्यासाठी २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव जि. प. आरोग्य विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २७६ आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांमध्ये ग्रामीण रुग्णांचा दुपटीने भार वाढला आहे. कार्यक्षेत्रातील गावांची लोकसंख्या वाढल्यामुळे आहेत त्याच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सुविधा दिल्या जातात. ग्रामीण रुग्णांना तत्पर रुग्णसेवा मिळण्यासाठी वाढीव लोकसंख्येनुसार जिल्ह्यात नवीन २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १९४ उपकेंद्रांची आवश्यकता आहे. याशिवाय आयुषअंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी १३ नागरी दवाखाने व आयुर्वेदिक दवाखाने, ४ युनानी दवाखाने उभारण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अत्यवस्थ रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी किमान ६ रुग्णवाहिका खरेदी कराव्या लागणार आहेत. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राची उपलब्ध सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन इमारत उभारणे, प्रशिक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, स्वच्छतागृह, संगणक कक्ष, वाचनालय, प्रशिक्षण कक्ष आदींसाठी ४ कोटी रुपये लागणार आहेत. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत मोडकळीस आली असून, त्याठिकाणी नवीन इमारत उभारणे गरजेचे आहे. यासाठी ६ कोटी रुपये लागतील. जिल्हा क्षयरोग केंद्राची आमखास मैदानाजवळ असलेली इमारत मोडकळीस आली असून, त्याठिकाणी नवीन इमारतीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांसाठी सध्या स्वतंत्र इमारत नाही. पंचायत समितीमध्ये एका खोलीत या कार्यालयांचा कारभार चालतो. या कार्यालयास स्वतंत्र इमारत उभारण्याची गरज आहे. ग्रामीण आरोग्य सेवेवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी चार याप्रमाणे २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. याशिवाय साथरोग नियंत्रणासाठी तालुकास्तरीय साथरोग पथक नेमण्याची आवश्यकता आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, परिचर, वाहनचालक नियुक्त करावे लागणार आहेत.