शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी जिल्ह्याला १३०० कोटींची गरज!

By admin | Updated: June 28, 2017 00:50 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची गरज असेल. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज यासंदर्भात सूतोवाच केले व पत्रकारांशी संवाद साधला. मोबदल्यासंदर्भातही आक्षेप स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जिरायती दाखवल्या जात असल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. यासंदर्भात नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. मोबदला निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल व मोबदल्याविषयी काही आक्षेप असल्यास तक्रार करता येईल. त्यामुळे बागायती-जिरायतीबाबत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील १६०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दरनिश्चितीही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १९५० पासूनच्या जमिनीच्या टायटलची तपासणी केली जात आहे. दरनिश्चिती करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.