हिंगोली : औंढा नागनाथ येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नागनाथ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य, सितार, बासरी, वीणा, तबला, मृदंग, हार्मोनियम, गिटार, शास्त्रीय नृत्य मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व (हिंदी किंवा इंग्रजी) असे एकूण २० कलाप्रकार राहणार आहेत. सहभागी होण्यासाठी १५ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक- युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. यासाठी १६ डिसेंबर २०१५ पुर्वी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे स्पर्धकांनी जन्मतारखेचा पुरावा सादर करावा. तसेच उशीराने आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. कलाकारांनी त्यांना आवश्यक असणारे वेशभूषा, ड्रेस, साहित्य, वाद्य, मेकअप साहित्य स्वत: आणावे, तसेच सी. डी., कॅसेटस, डी. व्ही. डी यावर कला सादर करता येणार नाही. कला सादर करताना इजा, दुखापत झाल्यास आयोजन समिती जबाबदार न राहता त्याची सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक व कलाकारांची राहिल. अंगी कलागुण असलेल्या युवकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
औंढ्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव
By admin | Updated: December 15, 2015 23:31 IST