शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

जिल्ह्यात मटका, जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरू

By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST

बीड: जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार मटका, जुगार अड्डे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ५ पथके स्थापन केली आहेत.

बीड: जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार मटका, जुगार अड्डे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ५ पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २० हून अधिक अवैध प्रवासी वाहतूक चालकावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान ग्रामीण भागासह शहरी भागातील बसस्थानक परिसरात मटका चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ४० हून अधिक मटका अड्ड्यावर धाड टाकून तेथे मटका घेणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या मालकावरही गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे मटका चालकांमध्ये दहशत पसरली आहे. जुगार खेळणाऱ्या व्यक्तींनाही पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे. जवळपास २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धाडसत्र पथकामार्फत सुरू आहे.प्रशिक्षणार्थी डीवायएसपींच्या जुगार अड्ड्यावर धाडीप्रशिक्षणार्थी डीवायएसपी एन.डी. शिरगावकर आणि एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने बुधवारी वडवणी बाजारतळावर जाऊन गुडगुडी नावाचा जुगार खेळत असणाऱ्या आठजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४२ हजार ११० रुपयांची रक्कम जप्त केली तर पिंपळनेरमध्ये मटका घेणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन ६ हजार ४४० रुपये जप्त केले. त्यानंतर सायंकाळी बीड शहरातील अंकुशनगरमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ६५ हजार ३४० रुपये जप्त केले. एका ठिकाणी तीन धाडी टाकून १ लाख १३ हजार रुपयांसह १४ आरोपी गजाआड केले आहे. (प्रतिनिधी)