शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाणी वितरणाची अचानक पाहणी

By admin | Updated: May 11, 2016 00:20 IST

लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़

लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़ गरीब वसाहतींमध्ये टँकर चालक व कर्मचाऱ्यांची मनमानी आहे़ ठराविक भागात मात्र मुबलक पाणी पुरवठा केला जात आहे़ मनपाचे अनेक प्रभाग अधिकारी घरात बसून टँकरचालकांच्या विश्वासावर वितरण करीत आहेत़ नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अचानक मंगळवारी शहरातील काही भागाची पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी केली़लातूर शहरासाठी उपलब्ध होणारे पाणी ४ जलकुंभातून सुमारे १३५ टँकरद्वारे वितरण केले जात आहे़ मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी प्रभागनिहाय पाणी वाटपाचे नियोजन करून दिले़ कधी कोणत्या भागात टँकर जाणार याचा सर्व लेखाजोखा तयार करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुचराईपणामुळे नियोजन विस्कटले आहे़ प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी टँकरवर असतात़ काही भागात नगरसेवकांचे कार्यकर्तेच पाणी वाटप करतात़ गरीब वसाहतींमध्ये पाणी वाटप करताना सरकारी पाण्याची मालकी टँकरचालकाकडे असते़ कुणाला किती पाणी द्यायचे, हे त्या टँकरचालक किंवा सोबतच्या रोजंदारीवरील कामगारावर अवलंबून आहे़ मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अचानक पाणी वितरणाची पाहणी सुरू केली़ जवळपास ३ तास भर उन्हात त्यांनी विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला़