शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदतीसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:10 IST

शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. चुन्ना नाल्याला आलेल्या पुराचे पाणी श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरानगर, राऊत कॉलनी, शिल्पकारनगर, नारायणनगर, नवीन श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, जयभीमनगर आदी भागांतील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. यामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीची दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. आजही अनेक नागरिक प्रशासनाने केलेल्या निवाºयामध्ये आहेत. या भागातील नागरिकांना त्वरित मदत द्यावी, बेघरांना घरे द्यावीत, येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अशोक काकांडीकर, पद्माकर सोनकांबळे, साहेबराव चौदंते, भीमराव क्षीरसागर, रवी सोनसळे, अ.रईस, युनसू आदींची उपस्थिती होती.