शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वकील मंडळाचा ७ एप्रिलला मतदानाचा ‘बार’ !

By admin | Updated: April 1, 2016 01:05 IST

लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीचा ‘बार’ लवकरच उडणार आहे. येत्या सहा तारखेला वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून

लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीचा ‘बार’ लवकरच उडणार आहे. येत्या सहा तारखेला वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात एप्रिलला बारची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. अण्णाराव पाटील यांनी चौथ्यांदा मैदानात उतरायचा मनोदय व्यक्त केला आहे. पाटील यांच्याविरोधात अद्याप उमेदवार ठरला नसला तरी यंदा त्यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी काही वकील मंडळी ‘कामाला लागली’ आहे. त्यामुळे ही सुध्दा निवडणूक यंदाही चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. लातूर जिल्हा वकील मंडळाचे सदस्य १२०० हून अधिक आहेत. वकील मंडळाच्या इतिहासात हॅटेट्रिक करणारे अण्णाराव पाटील एकमेव अध्यक्ष आहेत. आता चौथ्यांदा त्यांनी रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या विरोधात पॅनल उभारण्याच्या हालचाली चालू आहेत. पण अद्याप गुप्त बैठकांवरच ठिय्या आहे. अण्णाराव पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा पुकारा केला असून ते बांधणीसाठी वकीलांच्या भेट मोहिमेवर निघाले आहेत. सहा एप्रिल रोजी वकील मंडळाची सर्वसाधारण सभा होऊन निवडणूक निर्णय अधिकारी घोषित होईल. त्याच दिवशी अर्ज भरणे, छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होईल. बिनविरोध झाली तर लगेच घोषणा आणि नाही झाली तर ७ एप्रिल रोजी दुपारी तीन पर्यंत मतदान आणि ५ पर्यंत निकालाची घोषणा होईल, असे वकील मंडळाच्या सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी) बार असोसिएशनची निवडणूक ही गेल्या तीन वर्षांपासूनच प्रतिष्ठेची झाली आहे. एखाद्या बँक - कारखान्याच्या निवडणुकीसारखी त्याची प्रतिष्ठा वाढली आहे. अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अ‍ॅड. बळवंत जाधव आणि अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. मनोहर गोमारे, अ‍ॅड. उदय गवारे हे वेगवेगळ्या भूमिका असलेल्या राजकीय पक्षात काम करणारे सक्रीय कार्यकर्ते आहेत. वैचारिक भूमिका म्हणून यांचे मतभेद आहेत. मात्र बेद्रे, पाटील आणि जाधव हे एकमेकांचे वर्गमित्रही आहेत. या तिघांचीही भूमिका बारच्या निवडणुकीत निर्णायक राहीली आहे. हे एकत्रही असतात आणि एकही नसतात असे दोन्ही चित्र लातूरच्या वकीलांनी अनुभवले आहे. याशिवाय सामाजिक भूमिका मांडणारे मनोहर गोमारे आणि शेकापसारख्या लढाऊ पक्षाची धुरा वाहणारे गवारे यांच्या काय भूमिका आहेत, यावरही बारच्या निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.