उस्मानाबाद : स्त्री जन्माचा घटता दर पाहता केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना अंमलात आणली होती़ या योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने उत्कृष्ठ काम केल्याने देशातील दहा जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश झाला आहे़ मुलगाच हवा, या मानसिकतेतून होणारी स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदे अंमलात आणले आहेत़ मुलींचा घटता जन्मदर वाढविण्यासाठीही विविध योजना राबविल्या जात आहेत़ त्याच अनुषंगाने शासनाने बेटी बचाओ- बेटी पढाओ योजना अंमलात आणली होती़ या योजनेंतर्गत जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले असून, केंद्र शासनाकडून उत्कृष्ट कामासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी देशातील १० जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचीही निवड करण्यात आल्याचे पत्र महिला व बालविकास मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे़ या पुरस्काराचे २४ जानेवारी रोजी दिल्ली येथे वितरण होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्काराने गौरव होणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेत जिल्ह्याला पुरस्कार
By admin | Updated: January 23, 2017 23:47 IST