शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वकील, आय.आय.ए. संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:56 IST

एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उदय पांडे याच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. दुसºया लढतीत शुभम हरकळच्या कामगिरीच्या बळावर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट (आय.आय. ए.) संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघावर ८ गडी राखून मात केली.

ठळक मुद्देऔद्योगिक स्पर्धा : उदय पांडेचे दणदणीत शतक, शुभम हरकळ चमकला

औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उदय पांडे याच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. दुसºया लढतीत शुभम हरकळच्या कामगिरीच्या बळावर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट (आय.आय. ए.) संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघावर ८ गडी राखून मात केली.उदय पांडेने ७१ चेंडूंत ५ टोलेजंग षटकार व १४ चौकारांसह केलेल्या १३५ धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर जिल्हा वकील संघाने २० षटकांत ४ बाद २१२ धावा ठोकल्या. नीलेश जाधवने नाबाद २६ व अभिलेष पवारने १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी संघ ७ बाद १०५ धावाच करू शकला. त्यांच्याकडून दीपक सूर्यवंशीने २६ धावा केल्या. वकील संघाकडून खालेद सिद्दीकी व दीपक मानोरकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.दुसºया लढतीत वैद्यकीय प्रतिनिधी ‘ई’ संघाने २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या. त्यांच्याकडून मोहंमद अय्याजने ३५ धावा केल्या. आय.आय. ए. संघाकडून अमोल खरातने ३६ धावांत ३ तर सुनील भालेने २० धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात आय.आय.ए. संघाने विजयी लक्ष्य १४.५ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शुभम हरकळने ६ चौकार, ३ षटकारांसह ५२ व अमोल पवारने ५ चौकार व एका षटकारासह ४९ धावा केल्या. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन एमजीएमचे कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संजय चिंचोलीकर, उद्धव भवलकर, दामोधर मानकापे यांच्यासह अनंत नेरळकर, लक्ष्मण साक्रुडकर, प्रभुलाल पटेल, मनिंदरसिंग कानसा, लक्ष्मीकांत मेगदे, अशोक सातपुते आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गंगाधर शेवाळे, राजेश्वर सिद्धेश्वर, उदय बक्षी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, संदीप भंडारी, अजय देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.