शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

२० गावांचा विद्यूत पुरवठा होणार खंडित

By admin | Updated: September 19, 2014 01:01 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या गावांची शून्य वसुली आहे. तात्काळ थकित देयके न भरल्यास महावितरण कडक कारवाई करणार असल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.तालुक्यातील मादळमोही येथे ३३ उपकेंद्र आहे. या केंद्रांतर्गत अनेक गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या मादळमोही ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत आॅगस्ट २०१४ पर्यंत २० गावांतील शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीजदेयके भरलेले नाही. यामध्ये खडकी, धारवंटा, मानकापूर चिखली, कवडगाव, वडगाव, खुशी, कोळेवाडी, गाडेवाडी, टकलेवाडी, वंजारवाडी, बुधनरवाडी, आदी गावांत शून्य टक्के वसुली आहे. त्यामुळे २० गावांचा वीज पुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीने दिले आहेत. तरी तात्काळ थकित वीजबील न भरल्यास महावितरणकडून कारवाई करण्यात येणार आहे.ज्या गावांची वसुली २० टक्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांची वीज बिलाची वसुली वाढविण्याकरीता महावितरण कंपनीकडून वीज बील भरण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. मात्र या जनजागृती अंतर्गतही वीज बील भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.यामुळे वीज बील वसूली करीता महामंडळाचे कर्मचारी गावोगावी वाऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे ज्या लोकांकडे वीज बील बाकी आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील अनेक दिवसापासून महावितरण कंपनीकडून मोफत वीज वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.याबाबत मादळमोहीचे कनिष्ठ अभियंता प्रमोद दारतोंडे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊन वील बील भरावे व होणारी कारवाई टाळावी. यासाठी पथके तयार करण्यात आले असून हे पथके गावोगावी जाणार आहेत. ग्राहकांनी वीज बील भरून महामंडळाला सहकार्य करण्याचे अवाहनही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)