शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख एलईडी बल्बचे वाटप...!

By admin | Updated: July 14, 2015 00:29 IST

अशोक कारके , औरंगाबाद विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

अशोक कारके , औरंगाबाद विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता महावितरणच्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत. औरंगाबाद परिमंडळामध्ये १५ लाख ८१ हजार एलईडी बल्ब वितरित करण्यात येणार आहेत, असे परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी सांगितले. शहरात २ लाख ३२ हजार तर औरंगाबाद ग्रामीणमध्ये २ लाख ६६ हजार व जालना जिल्ह्यात १ लाख ५८ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. या साडेसहा लाख वीज ग्राहकांना महावितरणकडून जवळपास १६ लाख एलईडी बल्ब सवलतीमध्ये देणार आहेत. परिमंडळातील शंभर टक्के घरगुती ग्राहकांनी एलईडी दिवे वापरल्यास जवळपास ७० टक्के विजेची बचत होईल. त्यामुळे घरगुती वीजबिल कमी होईल. त्याचा फायदा ग्राहक आणि कंपनीला होईल. राज्यात कंपनीचे १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांनी एलईडी वापरल्यास दरवर्षी १ हजार ३०० मेगावॅट युनिट विजेची बचत होणार आहे. एक घरगुती ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे दोन ते चार बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. तीन वर्षापर्यंत बल्बची गॅरंटी देण्यात येईल. पूर्वी अ‍ॅल्युमिनियमच्या तारा असलेले बल्ब वापरले जात होते. यात अधिक वीज खर्च होत होती. आता बहुतांशी नागरिक सीएफएल बल्ब वापरत आहेत. या बल्बमुळेही विजेची बचत होते. पण त्यापेक्षा अधिक बचत एलईडी बल्ब वापरल्याने होते. कारण त्यामध्ये सिलीकॉन धातूने बनविलेली डायड सिस्टिम वापरली जाते. वीज बचतीचे गणित ४० व्हॅटच्या एका बल्बचा वापर होत असेल तर २५ तासांना १ युनिट रीडिंग पडते. एक एलईडी बल्ब वापरल्यास १२५ तासांना एक युनिट रीडिंग पडते. एलईडी बल्ब वापरल्यास जवळपास ८० टक्के विजेची बचत होईल, असे गणित आहे.