शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक

By admin | Updated: July 26, 2014 00:38 IST

जगदीश पिंगळे, बीड मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे.

जगदीश पिंगळे, बीडमराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे. धरणांपासून ते शहरापर्यंतचे अंतर बरेच असल्याने पाणीपुरवठ्यासाठी करावा लागणारा वाढता खर्च ही प्रशासनासमोर डोकेदुखी बनली आहे.मराठवाड्यातील ८०४ धरणात सध्या २३ जुलैच्या आकडेवारीनुसार केवळ १५ टक्केच पाणी शिल्लक आहे. जायकवाडीत तर ४१ दलघमी म्हणजे केवळ २ टक्केच पाणी आहे. मराठवाड्यातील एकूण लहान मोठ्या धरणांची पाणी साठवण क्षमता ७५९९ दलघमी आहे पण सध्या ११०३ दलघमी पाणी आहे. सिध्देश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीना, कोळेगाव ही धरणे तर मृतसाठ्याच्या खाली आहेत.मराठवाड्यात २५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात जाफराबाद, जालना, बदनापूर, घनसांगवी, मंठा, गेवराई, शिरूर कासार, जळकोट, बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, अर्धापूर, नायगाव खुर्द, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव, मानवत या तीस तालुक्यांचा समावेश आहे. फक्त उमरगा, लोहारा या तालुक्यात शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला.‘कडा’ चे मुख्य अभियंता जोगदंड ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले जायकवाडीत गतवर्षी एप्रिलमध्येच शून्य टक्केखाली पाण्याची टक्केवारी आली होती त्या तुलनेत यंदा जुलैत पाणी प्रश्न चिंताजनक झाला आहे पाऊस योग्य झाल्यास अडचणी दूर होतील. मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया आणि कडाचे जलअभ्यासक अभियंता अरूण घाटे म्हणाले, आता दूरच्या धरणातील पाणी आणणे परवडणारे नाही. उस्मानाबाद शहरास १२० किमी अंतरावरून उजनी धरणातून पाणी येते त्यासाठी विजेचा खर्च काही कोटीच्या घरात जातो. मांजरा धरणातून अंबाजोगाई अन्य शहरांना पाणी पुरवठा होतो ही शहरेही धरणापासून खूप दूर आहेत. परळी, शहर आणि थर्मल पॉवरस्टेशनला पाणीपुरवठा सोनपेठ भागातून होतो हे अंतरही खर्चिक आहे.औरंगाबादची लोकसंख्या १९७१ ला जेव्हा जायकवाडी पूर्ण झाले तेव्हा १ लाख २० हजारांच्या आसपास होती आता २०१४ मध्ये ती औरंगाबाद आणि विस्तारित वसाहतीत १५ लाखांच्या पुढे आहे. औरंगाबादला पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा खर्च ३० कोटीच्या आसपास येतो. पण नगर आणि जालना जिल्ह्णातील गावे दूर आहेत. डॉ लोहिया म्हणाले, दरवर्षी आम्ही मराठवाडा वैधानिक मंडळाच्या बैठकीत या सूचना मांडीत असतो पण त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.