बीड : जिल्हा परिषदेच्या समाकल्याण कार्यालयात एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह तोडफोड केली. बुधवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर कामकाज विस्कळीत झाले; परंतु कर्मचार्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही.महिन्यापूर्वीच समाजकल्याण कार्यालय सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत स्थलांतरीत झालेले आहे. बुधवारी दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयात एकच कर्मचारी बसलेला होता. इतर कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेलेले होते. यावेळी एक तरुण अन्य दोघांसमवेत तेथे दाखल झाला. त्याने माझे काम का करत नाही? असे म्हणत टेबलवरील काचेची तोडफोड केली. फाईलची फेकाफेक करुन संगणक, खुच्र्या, टेबल व बॅटर्यांचीही नासधूस केली. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून गेले.भयभीत झालेल्या कर्मचार्याने धावत खाली येऊन सुरक्षारक्षकाची मदत घेतली. दरम्यान, या घटनेनंतर कार्यालय तासभर बंद ठेवण्यात आले. कर्मचार्यांमध्ये सायंकाळपर्यंत दहशतीचे वातावरण होते. हल्ल्यामागचे कारण?हल्ला करणार्या तरुणाने दीड वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेला आहे. त्याने आंतरजातीय विवाहांना समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणार्या प्रोत्साहन अनुदानासाठी समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला.रितसर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो सहा महिन्यांपासून खेटे मारत होता; परंतु त्याला काही अनुदान मंजूर झाले नाही. त्यामुळे त्याने थेट हल्ला चढविल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
'समाजकल्याण'मध्ये तोडफोड
By admin | Updated: December 31, 2015 13:50 IST
जिल्हा परिषदेच्या समाकल्याण कार्यालयात एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह तोडफोड केली.
'समाजकल्याण'मध्ये तोडफोड
जि.प. समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांची पदोन्नतीवर ठाणे येथे बदली झाली आहे. प्रभारी कार्यभार मंगळवारपर्यंत विठ्ठल नागरगोजेंकडे होता. कार्यमुक्त होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोनकवडे बुधवारी तात्पुरत्या रूजू झाल्या. त्यामुळे कार्यालयात तोडफोड होऊनही कोणी गांभीर्याने घेतले नाही. शिवाय अनुदान वाटपास समाजकल्याण कार्यालयानेच विलंब केला. त्यामुळे पोलिसांत फिर्याद देण्यासही कोणी पुढे आले नाही.
(प्रतिनिधी)