शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

पाणीटंचाईवरून विरोधकांचा सभात्याग

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

जालना : जिल्ह्यात पंचायत समिती पातळीवर अनेक गावांमधील टँकरचे प्रस्ताव रखडल्याच्या मुद्यावरून मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची गोंधळ घातला.

 जालना : जिल्ह्यात पंचायत समिती पातळीवर अनेक गावांमधील टँकरचे प्रस्ताव रखडल्याच्या मुद्यावरून मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची गोंधळ घातला. प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करून या सदस्यांनी सभात्याग केला. दुपारी २.३० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सभापती वर्षा देशमुख, शीतल गव्हाड, रुख्मीणी राठोड, बप्पासाहेब गोल्डे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ग्रामीण भागात वीज बील थकबाकीमुळे शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याबद्दल अनिरुद्ध खोतकर, सतीश टोपे यांनी नाराजी व्यक्त करून महावितरणच्या अधिकार्‍यांनी कठोर भूमिका न घेता शेतकर्‍यांना बील भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या मुद्यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. काही गावांतील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे सतीश टोपे यांनी सांगितले. ज्या गावात टंचाई आहे, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसील कार्यालयात पडून आहेत. काही ठिकाणी तर ग्रामसेवकांनी प्रस्तावच तयार केलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप टोपे यांनी केला. वाकुळणीकर यांनीही बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांचे प्रश्न मांडले. त्यावर काही गटविकास अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तराने विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. पदाधिकारी व प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करून विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांसह सभा सुरू होती. खोतकर, संभाजी उबाळे, रामेश्वर सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. सुरुवातीला जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबद्दल व दानवेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सदस्य भगवानसिंग तोडावत यांच्या वतीने सभागृहात पेढे वाटप करण्यात आले. अंबड तालुका टंचाई निवारणाची बैठक पालकमंत्री राजेश टोपे यांनी स्वतंत्र घेतली. तर त्यानंतर आ. संतोष सांबरे यांनीही बैठक घेतली. मात्र दोन्ही बैठकांपैकी कोणत्या बैठकीतील सूचना टंचाई निवारण आराखड्यात घ्यायच्या, अशा संभ्रमात प्रशासन होते, अशी माहिती सेनेचे अनिरुद्ध खोतकर यांनी सभागृहात दिली. त्यामुळेच अंबडच्या गटविकास अधिकार्‍यांना सभागृहात उत्तरे देताना अडचण झाली, अशी पुष्टीही खोतकर यांनी जोडली. ... तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार जिल्हा परिषद प्रशासनाने आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आजपर्यंत कधीच गांभीर्याने कार्यवाही केलेली नाही. सातत्याने विविध प्रश्न मांडले. काही घोटाळेही उघड केले, मात्र प्रशासनाकडून कार्यवाहीसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने हीच भूमिका कायम ठेवल्यास पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रशासनातील अधिकार्‍यांची तक्रार करू, असा इशारा जि.प.तील राकाँचे गटनेते सतीश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी काँग्रेसचे राजेश राठोड, एल.के. दळवी, राकाँचे अ‍ॅड. संजय काळबांडे, आशा आकात, पं.स. सभापती अनिता पैठणे आदींची उपस्थिती होती.