शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बंकटस्वामी शिक्षण संस्थेचा वाद नऊ महिन्यांत निकाली काढा

By admin | Updated: August 11, 2014 00:19 IST

बीड : खडकी (घाट) येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात सहा महिन्यांच्या आत कारवाई करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने लातूरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांना दिले आहेत.

बीड : तालुक्यातील खडकी (घाट) येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात सहा महिन्यांच्या आत कारवाई करावी, सदस्यांच्या यादीसंदर्भातील वाद तातडीने निकाली काढावेत आणि मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्याखालील प्रकरण नऊ महिन्यांच्या आत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लातूरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांना दिले आहेत. श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेचा बऱ्यांच दिवसांपासून वाद आहे. हे प्रकरण २००९ पासून न्यायप्रविष्ठ आहे. श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेने वेळेत हिशेब दिले नाहीत म्हणून लातूर सहा. धर्मदाय आयुक्तांनी कार्यकारिणीचे नऊ पैकी सहा सदस्य चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. दरम्यानच्या कालावधीत, औरंगाबाद खंडपीठात संस्थेचे सचिव आर.एच. भोसले यांनी याचिका दाखल करत कार्यकारिणीवर गदा येत असल्याने म्हटले होते. त्यावर सुनावणी करत हा निवडणुकीचा वाद नसून सदस्य निवडीचा वाद आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपिठाने श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या निवडणुका घेण्या संदर्भात सहा महिन्यांच्या आत कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. सदस्यांच्या यादी संदर्भातील वाद तातडीने निकाली काढावीत तसेच मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्याखालील प्रकरण नऊ महिन्यांच्या आत निकाली काढावेत असे आदेश न्या. ए.एम. बदर व एस.व्ही. गंगापुरवाला यांनी नुकतेच दिले आहेत. दरम्यान, श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेवर प्रशासक म्हणून अ‍ॅड. प्रशांत माने यांची नियुक्ती केली नसून काही व्यक्ती दिशाभूल करणाच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप संस्थेचे सचिव आर.एच. भोसले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)