शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक्स सेक्टरमधील कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:03 IST

:लोकमत इफेक्ट; एक्स सेक्टरमधील कचºयाची विल्हेवाट लोकमत इफेक्ट : वाळूज उद्योगनगरीत स्वच्छता अभियान वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत साचले ...

:लोकमत इफेक्ट; एक्स सेक्टरमधील कचºयाची विल्हेवाट

लोकमत इफेक्ट : वाळूज उद्योगनगरीत स्वच्छता अभियान

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत साचले कचऱ्याचे ढीग या आशयाचे वृत्त शनिवारी (दि.९) लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला खडे बोल सुनावताच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने या सेक्टरमध्ये परिसर स्वच्छ केला.

एमआयडीसी वाळूज परिसरातील एक्स सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला आहे. या परिसरातील हॉटेल, भाजीपाला विक्रेते आदींसह विविध व्यावसायिक या मोकळ्या भूखंडावर हॉटेलमधील शिळे अन्नपदार्थ, टाकाऊ भाजीपाला व केरकचरा आणून टाकत असल्याने या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहे. उद्योगनगरीत कचरा संकलनाचे काम करणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीकडून या सेक्टरमधील कचऱ्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड या भागातील व्यवसायिकांनी केली होती. या भागात नियमितपणे केरकचरा उचलला जात नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने व्यावसायिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे मोकाट जनावरे, कुत्री आदींचा या परिसरात मुक्त संचार वाढला आहे. संबंधित कंपनीकडून या सेक्टरमध्ये स्वच्छता केली जात नसल्याची ओरड व्यावसायिकांतून सतत केली जाते.

एक्स सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान

या सेक्टरमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे वृत्त लोकमतने शनिवारच्या अंकात सविस्तर प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी कचरा संकलन करणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्याची कानउघडणी करीत त्वरित स्वच्छता करण्याचे आदेश बजावले होते. त्यामुळे कंपनीकडून या सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान राबविल्याने या परिसरातील व्यवसायिकांनी लोकमतचे आभार मानले.

फोटो ओळ

वाळूज एमआयडीसीतील एक्स सेक्टरमध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीकडून स्वच्छता अभियान राबूवन परिसर स्वच्छ करण्यात आला.