शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील खाते बदलाचा ठराव फेटाळला

By admin | Updated: March 19, 2016 20:22 IST

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढण्याचा सत्ताधाऱ्यांनी आणलेला ठराव बहुतांश सदस्यांनी विरोध केल्याने फेटाळला गेला.

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढण्याचा सत्ताधाऱ्यांनी आणलेला ठराव बहुतांश सदस्यांनी विरोध केल्याने फेटाळला गेला. त्यामुळे हा ठराव रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी सदस्यांवर आली.जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेले खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडावे, असा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता. या ठरावाला काही सदस्यांनी विरोध दर्शविला. तब्बल एक तास याच विषयावर चर्चा झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्हा परिषदेला १ कोटी ४६ लाख रुपये व्याजापोटी दिले आहेत. तसेच सर्व सुविधा जिल्हा बँक देते. बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयही घेतले जातात. त्यामुळे या बँकेतून खाते काढण्यात येऊ नये, असे सदस्य बालाजी देसाई यांनी सांगितले. त्यानंतर काही सदस्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते काढले जात आहे, असा सवाल केला. त्यानंतर हा ठराव ५२ विरुद्ध शून्य मताने नामंजूर करा किंवा मतदान घेण्यात यावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. त्यानंतर जि. प. अध्यक्ष सभागृहातून त्यांच्या कक्षामध्ये गेले. त्यांच्यापाठोपाठ विरोध करणारे सदस्यही गेले. तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यानंतर सभागृहामध्ये समशेर वरपूडकर यांच्या हस्ते ३३ सदस्यांच्या स्वाक्षरीचे ठराव फेटाळण्याचे निवेदन अध्यक्षांना देण्यात आले. त्यामुळे हा ठराव फेटाळण्यात आला. परिणामी सत्ताधाऱ्यांची या ठरावावरुन नाचक्की झाल्याचे दिसून आले.