शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:59 IST

दिवाळी पहाटची स्वरमयी परंपरा कायम राखत दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ या सांगीतिक मैफलीचे २० आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाडव्याच्या मंगलमयी वातावरणात गूढ काव्य, अप्रतीम संगीत आणि स्वरस्वर्ग अशा गायकीचा ‘न भूतो, न भविष्यती’ अनुभव घेण्याची संधी यंदाच्या पाडव्याला उपलब्ध झाली आहे. दिवाळी पहाटची स्वरमयी परंपरा कायम राखत दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ या सांगीतिक मैफलीचे २० आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलेआहे.पहाटेच्या हुडहुडी भरविणा-या थंडीत लोकमत भवनच्या हिरवळीवर शुक्रवारी सकाळी ६ वाजता सुरांची आतषबाजी सुरू होणार आहे. प्रख्यात अभिनेते व कवी मकरंद देशपांडे, ख्यातनाम गायक पं. अजय पोहनकर आणि तरुणाईचे ‘फेव्हरेट’ अभिजित पोहनकर यांच्या मैफलीत बुजुर्ग गायकी आणि तरुणांचा संगीत वाद्याविष्काराचा अनोखा साक्षात्कार या दिवाळी पहाटमध्ये अनुभवयाला मिळणार आहे.मकरंद देशपांडे यांच्या नव्या युगातील कवितांचे अभिवाचन, पं. पोहनकर यांचा स्वरसाजाने नटलेली, सजलेली, फुललेली गजल व पारंपरिक ठुमरीचे सादरीकरण आणि कीबोर्ड, गिटार, बासरी व तबल्याचे वादन, अशा जुगलबंदीचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध झालीआहे.‘दिशा गु्रप’ या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. सहप्रायोजकाची भूमिका ‘भाग्यविजय’ आणि ‘लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल’ यांनी घेतली असून, डेकोरेशन पार्टनर ‘एमडी महावीर’ तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘अगत्य केटरर्स’ आहेत.कसा असेल प्रवेश?कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजच आपली मोफत सन्मानिका (पास) राखून ठेवा. एका सन्मानिकेवर एकाकुटुंबातील सदस्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ‘सखी मंच’ व ‘प्रिव्हिलेज मंच’ सदस्य ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळवू शकतात. कार्यक्रमाला दर्दी रसिकांची गर्दी उसळणार हे नक्की.‘प्रथम आगमनास प्रथम प्राधान्य’ देण्यात येणार असल्यामुळे कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी येऊनच जागा निश्चित करावी. सुराच्या मेजवानीसह रसिकांना दिवाळी फराळाचाही आस्वाद घेता येणार आहे.