शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

स्पील ओव्हरच्या कामावरून चर्चेचे गुऱ्हाळ

By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST

स्पील ओव्हरच्या कामावरून चर्चेचे गुऱ्हाळ

औरंगाबाद : महापालिका नगरसेवकांची मागील ४ वर्षांपासून शिल्लक राहिलेली सुमारे १०१ कोटी रुपयांची कामे वर्ष २०१४-१५ च्या बजेटमधून कापण्यात आली आहेत. एक आठवड्यापासून स्पील ओव्हरच्या कामांवरून सेना- भाजपा नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. प्रशासनाने मनपाची आर्थिक परिस्थिती समोर आणली आहे. त्यामुळे बजेटमधील स्पील ओव्हरची कामे काही पदाधिकाऱ्यांनी कापली आहेत काय, असा संशय नगरसेवकांना येत आहे. त्यामुळे २ आॅगस्टपासून स्पील ओव्हरच्या कामांवरून नगरसेवक विरुद्ध सत्ताधारी असे वातावरण निर्माण झाले आहे. महापौर कला ओझा यांनी ७९० कोटी रुपयांचे बजेट प्रशासनाला दिले असून त्यात अनेक नगरसेवकांची कामे कापण्यात आली आहेत. त्या कामांवरून महापौरांच्या दालनात आज आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये बैठक झाली. बैठकीत कुठलाही महत्त्वपूर्ण तोडगा निघाला नाही. मात्र, ज्या नगसेवकांचे स्पील ओव्हरचे एकही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे २५ लाख रुपयांचे काम बजेटमध्ये घेण्याचा तोडगा बैठकीत निघाल्याचे विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी सांगितले. ज्या नगरसेवकांची कामे अंदाजपत्रक तयार करण्यापर्यंत पोहोचली आहेत. ती कामे पूर्ण होतील. त्यांची नवीन स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत. असाही निर्णय बैठकीत झाला आहे. बैठकीला महापौरांसह, सभागृह नेते किशोर नागरे, सभापती वाघचौरे, नगरसेवक हुशारसिंग चौहान, नगरसेविका प्रीती तोतला आदींची उपस्थिती होती.