शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

साई महाविद्यालयाच्या निर्णयावर चर्चेचे गुऱ्हाळ

By admin | Updated: June 21, 2017 00:09 IST

औरंगाबाद : वादग्रस्त ठरलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर मंगळवारी विद्यापीठाच्या विद्या परिषदेत चर्चेचे गुऱ्हाळच चालले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वादग्रस्त ठरलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर मंगळवारी विद्यापीठाच्या विद्या परिषदेत दिवसभर केवळ चर्चेचे गुऱ्हाळच चालले. रात्री सात वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. शेवटी बैठक स्थगित करीत ती उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते, तर प्रभारी अधिष्ठातांसह उच्च शिक्षण, तसेच तंत्रशिक्षणचे सहसंचालक उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वादग्रस्त ठरलेल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय बैठकीत ठेवण्यात आला होता. या बैठकीत यावर दिवसभर चर्चा करण्यात आली; मात्र कोणत्याही निर्णयावर एकमत झाले नाही. शेवटी सायंकाळी सात वाजल्यामुळे बैठक स्थगित करीत उद्या, बुधवारी घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.‘त्या’ महाविद्यालयाच्या संलग्नीकरणाला आक्षेपअकरा वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कन्नड तालुक्यातील मोहाडी येथील वरिष्ठ कला महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याविषयीचा अहवाल बैठकीत मांडण्यात आला आहे; मात्र त्यावर कोणाताही निर्णय झाला नाही. या महाविद्यालयाला संलग्नीकरण देण्यात येऊ नये, यासाठी अनेकांनी आक्षेप घेतले असल्याचे समजते. या आक्षेपांचे निवेदने कुलगुरूंना देण्यात आले आहे. यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी एका संघटनेने कंत्राटच घेतले असून, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्संलग्नीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.