औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुखचा ‘रोड शो’ पाहण्यासाठी कामगार चौक ते गजानन महाराज मंदिर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला जवळून पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. हजारो आबालवृद्ध चोहोबाजूंनी रस्त्यावर जमा झाले होते; पण सर्वांनी शिस्तीचे दर्शन घडवीत हा शो यशस्वी केला.
प्रचंड गर्दीतही शिस्तीचे दर्शन
By admin | Updated: October 12, 2014 00:41 IST