आपत्तीच्या काळात अग्निशमन विभाग कशाप्रकारे काम करू शकतो, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या काळात गतिमान संवाद गरजेचा असून तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कृषी सहायक यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या. तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अप्पर तहसिलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी, औरंगाबाद महापालिकेतील अग्निशमन विभागाचे मुंगसे यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांकडून माहिती मागविली असून त्या माहितीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत आहे. याशिवाय गावपातळीवरील पोलीस पाटील, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांपासून तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्यात मोबाईलच्या माध्यमातून प्रभावी संवाद यंत्रणा कायम राहावी यासाठी संवाद आराखडाही तयार करण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामे व आपत्ती परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत तहसीलदारांनी मार्गदर्शन केले.
फोटो : आपत्ती व्यवस्थापन बैठकीप्रसंगी माहिती जाणून घेताना अधिकारी.
070621\1623064728-picsay.jpg~070621\07_2_abd_53_07062021_1.jpg
आपत्ती व्यवस्थापन बैठकीप्रसंगी माहिती जाणून घेताना अधिकारी.~आपत्ती व्यवस्थापन बैठकीप्रसंगी माहिती जाणून घेताना अधिकारी.