शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

By admin | Updated: August 31, 2014 00:11 IST

परभणी : आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मंजुरी असणाऱ्या संख्येइतके प्रवेश दिले जात नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे़

परभणी : आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मंजुरी असणाऱ्या संख्येइतके प्रवेश दिले जात नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे़ दरम्यान, नॅशनल एस़सी, एस़टी़, ओबीसी स्टुडंट युथ फ्रंटने (एनएसओएसवायएफ) ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याप्रकरणी चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़ परभणी व हिंगोली जिल्ह्यात शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह आहेत़ परंतु, या वसतिगृहांमध्ये शासकीय मंजुरी इतका प्रवेश विद्यार्थ्यांना दिलेला नाही़ परभणी येथील वसतिगृह क्रमांक २ मध्ये २५० विद्यार्थी संख्या मंजूर असताना तीन वर्षांपासून केवळ १५४ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो़ त्यामुळे ९६ विद्यार्थीसंख्या न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ असाच प्रकार उर्वरित वसतिगृहांमध्ये देखील होत आहे़ या वसतिगृहांमध्ये १२५ विद्यार्थी संख्या मंजूर असताना ७० ते ८० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो़ त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान आदिवासी विकास विभागामार्फत होत आहे, असा आरोप एनएसओएसवायएफ संघटनेने केला आहे़ तीन वर्षांपासून जवळपास ५०० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे याप्रश्नी त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी संघटनेचे पंकज धाबे, शिवाजी नाईक, कृष्णा नाईक, सर्जेराव नाईक, दत्ता गुहाडे, राजू बेले, अनिल नाईक, गोरखनाथ सावंत, सुधाकर डुकरे आदींनी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आयुक्तांकडे केली आहे़ (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाच्या सूचनादरम्यान, हा प्रकार संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला़ त्यावर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नुकतेच कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर बाबीवर सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत़ आदिवासी विकास विभागामार्फत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मुलांचे व मुलींचे असे ९ वसतिगृह आहेत़ परभणी येथे मुलांचे दोन आणि मुलींचे तीन तर हिंगोली येथे मुलांचे व मुलींचे प्रत्येकी दोन वसतिगृह आहेत़