शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा शेतकºयांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या १८९०० शेतकºयांपैकी ७४४१ शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात १७ कोटी ३३ लाख ११ हजार ३४९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध बँकेच्या ९२८१ खातेदारांनी कर्जमाफीसाठी दाखल केलेल्या आॅनलाइन अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत. काही अर्जात दाखल केलेली माहिती व बँकेने दाखल केलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने या शेतकºयांना कर्जमाफी यादीत स्थान मिळाले नाही.या शेतकºयांच्या अर्जांची तपासणी करून ते कर्जमाफीच्या निकषात बसतात का नाही, याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे असे अर्ज तपासून पुन्हा कर्जमाफी यादी निश्चित करण्यात येणार आहे.तफावत असलेले बँकनिहाय अर्जजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २२६९पंजाब नँशनल बँक ३०महाराष्ट्र ग्रामीण बँक १२९कँनरा बँक १४७सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९५४देना बँक ५०२बँक आॅफ बडोदा ७८स्टेट बँक आॅफ इंडिया ३१८५बँक आॅफ महाराष्ट्र १३९४आय सी आय सी बँक ५९३नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहनबँकेकडून कर्ज उचलून या कर्जाची नियमित परतफेड करणाºया तालुक्यातील शेतकºयांनाही कर्जमाफी मिळाली असून या अंतर्गत २८९७ शेतकºयांना ४ कोटी १७ लाख ५९ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. याचबरोबर रूपांतरीत हप्ते पाडून दिलेल्या ८९ शेतकºयांनाही १७ लाख ९२ हजार ९१३ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.च्अर्जदार व बँकेकडील माहितीआधारे ताळमेळ घालून जे अर्जदार पात्र ठरले, त्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यक त्या याद्या व रक्कम सर्व बँकांना आॅनलाइन पद्धतीने वितरीत करण्यात आल्या आहेत. परंतु बँकेने पुरविलेल्या कर्जखात्यातील माहितीतील त्रुटी व शेतकºयांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही, अशा प्रकरणात निकषात बसणारे अर्जदार शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकºयांनी आपल्या बँकेकडे संपर्क साधून अर्ज दुरूस्ती करून घ्यावी. काही अडचण आल्यास सहायक निबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी१८९०० शेतकºयांपैकी १.५ लाख रूपयांच्या आत कर्ज असलेल्या ४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली असून या पोटी १२ कोटी ९७ लाख ५८ हजार ७७६ रूपये या शेतकºयांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आले आहेत.