शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल-टी पॉइंटवर प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: August 30, 2014 00:16 IST

औरंगाबाद : सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. ठिकाणी जाण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथून बस पकडावी लागते; परंतु प्रवास सुरू करण्याआधी या ठिकाणी प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

औरंगाबाद : सिडको आणि परिसरातील रहिवाशांना सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. ठिकाणी जाण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथून बस पकडावी लागते; परंतु प्रवास सुरू करण्याआधी या ठिकाणी प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. भररस्त्यावर उभे राहून बस येण्याची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागत आहे.मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. गावांसाठी बस सोडण्यात येतात. या बस हर्सूल टी-पॉइंटमार्गे जातात. त्यामुळे सिडको आणि परिसरातील रहिवाशांना या गावांसाठी हर्सूल टी-पॉइंटहून बस पकडावी लागत आहे. या ठिकाणी अनेकदा बस थांबत नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते, तर अनेकदा मध्यवर्ती बसस्थानकातून खचाखच भरून येणाऱ्या बसमुळे हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांना अनेकदा सिल्लोडपर्यंत जागा मिळत नाही. याशिवाय येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मोठ्या शेडची सुविधा नाही. शिवाय या ठिकाणी उतरल्यावर सिडको भागात जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून जादा पैसे आकारले जातात. विविध ठिकाणी थांबा असलेली बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.काळी-पिवळींचा विळखाहर्सूल टी-पॉइंट चौकात काळी-पिवळींचा विळखा दिसून येतो. एसटी महामंडळाच्या बसची प्रतीक्षा करण्यापेक्षा नाइलाजाने काळी-पिवळीतून प्रवास करण्यावर अनेक प्रवासी भर देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नासही फटका बसत आहे.स्वतंत्र बससेवेची मागणीसिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ, बुलडाणा, मलकापूर इ. गावांसाठी सिडकोतून स्वतंत्र बससेवा सुरूकरण्यात यावी तसेच या गावांना जाण्यासाठी सिडकोतील एसबीआय चौक, वोखार्ड चौक, आंबेडकर चौक, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर येथे थांबा असणारी स्वतंत्र बससेवा सुरूकरावी, अशी मागणी होत आहे. यासाठी सिडको बसस्थानक आणि सिल्लोड बसस्थानकात स्वतंत्र प्लॅटफॉर्म ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. गावांसाठी सिडकोतून स्वतंत्र बससेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.