शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

दिंडीचे प्रस्थान

By admin | Updated: June 21, 2014 00:56 IST

कंधार: प्रसिद्ध श्री संत साधू महाराज यांनी सुरु केलेली कंधार - पंढरपूर पायी वारीची परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. तिसऱ्या पिढीने दिंडीची परंपरा जतन केली

कंधार: प्रसिद्ध श्री संत साधू महाराज यांनी सुरु केलेली कंधार - पंढरपूर पायी वारीची परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. तिसऱ्या पिढीने दिंडीची परंपरा जतन केली असून २० जून रोजी टाळ मृदंगाच्या निनादात दिंडीने प्रस्थान केले. जागोजागी दिंडीचे स्वागत करण्यात आले.पंढरपूर पायी वारी साधू महाराज यांच्या काळापासून सुरु आहे. महाराज भगवान दत्तात्रयाचे अनुग्रहीत होते. त्याचप्रमाणे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते. वारीला प्रस्थान करण्यापूर्वी आपले घर गरिबांना लुटण्यास महाराज मोकळे करत असत. हातात चपळ्या, गळ्यात वीणा, चाळ आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेत पंढरीच्या दिशेने निघत असत. जाताना वाटेत अनेक मुक्काम करत महाराज भक्तांसह पायी विठ्ठलाचे दर्शन घेत असत. महाराज हे परभणी जिलञह्यातील कानडखेडचे. परंतु कंधारला ते स्थायिक झाले. महाराज दत्तात्रयाच्या भेटीसाठीही माहूरला जात असत. असेच जाताना त्यांची उमरखेड येथे प्रकृती बिघडली. दोन धर्मात ऐक्याचा पुरस्कार करण्याचे महान कार्य करणारे महाराज वैकुंठवासी झाले. आजही त्यांची उमरखेडला समाधी आहे. महाराजांची परंपरा वंशपरंपरेने जिद्दीने चालविली.शुक्रवारी दिंडी विठ्ठलाच्या जयघोषात व टाळ मृदंग, वाद्याच्या निनादात शहरातून प्रस्थान केली. दिंडी एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघाली. दिंडीत दत्त महाराज, शिवाजी केंद्रे, सूर्यकांत चालीकवार, नरसिंग करेवाड आदींसह भाविक, स्त्री, पुरुष सहभागी झाले होते. आ. शंकरअणा धोंडगे, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, जि. प. सदस्य दिलीप धोंडगे, दत्ता पवार, बाबूराव केंद्रे, मधुकर डांगे, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, भगवान महाराज व्यास, गोविंद हेडंगे, मिलिंद महाजन, गणेश महाजन आदींनी स्वागत केले.पायी दिंडीत नगराध्यक्षा शोभाताई नळगे या पंढरपूरपर्यंत सहभागी झाल्याची माहिती शहाजी नळगे यांनी दिली. कमानीचा झरा व गुराखी गडावर दिंडीचे माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे, प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे, प्रा. डॉ. एकनाथ पवार, प्रा. शंकर आंबटवाड, व्ही. जी. चव्हाण, डॉ. सुभाष नागपूर्णे, प्रा. डॉ. डी. एस. सावंत, माजी सरपंच शिवाजी आईनवाड आदींनी स्वागत केले. (वार्ताहर)पायी दिंडीला झाले ६० वर्षे पूर्ण अलीकडच्या काळात पायी दिंडीचे शंकर महाराज व सीताराम महाराज कंधारकर यांनी पुनरुज्जीवन केले. कंधारच्या या प्रसिद्ध पायी दिंडीला ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. शंकर महाराज कंधारकर व सीताराम महाराज खंदारकर यांच्या निधनानंतरही संस्थानचे पिठाधीश एकनाथ महाराज व त्यांचे बंधू ज्ञानेश्वर महाराज यांनी परंपरा जतन केली आहे.