शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांविरुद्ध विधानसभेत हक्कभंग

By admin | Updated: March 31, 2016 00:33 IST

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहात एकमताने हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला.

‘सर्वांसाठी घरे’ तापले : सुनील देशमुख आक्रमक, विधिमंडळात सर्वपक्षीय सदस्य एकवटलेअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहात एकमताने हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला. अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकारांचा भंग आणि अवमाननेची नोटीस दिली होती. ‘सर्वांसाठी घरे’ ही प्रधानमंत्री आवास योजना राबविताना लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वकरीत्या डावलने आणि स्वमर्जीनुसार योजनेची अंमलबजावणी करणे या प्रमुख मुद्यांवर आमदार देशमुख यांनी २८ रोजी दाखल केलेल्या प्रस्तावावर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी हक्कभंगाची सूचना मांडण्याची परवानगी दिली. ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी निर्मूलन मंत्रालयातर्फे राबविली जात आहे. शासननिर्णयानुसार महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांकडे सोपविण्यात आली. त्यानुसार आयुक्त गुडेवार यांनी राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समितीकडे एकूण ७,०१८ घरकुलांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर के ला. तथापि प्रस्ताव सादर करताना गुडेवारांनी योजनांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. घरकुलांचा प्रस्ताव राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समितीपुढे सादर करण्यापूर्वी महानगर क्षेत्रातील आमदार या नात्याने माझे मत विचारात घेणे आवश्यक होते, अशी भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली. लाभार्थ्यांची यादी मंजूर करताना आमदारांना अवगत करण्यात आले नाही. ही बाब विधानमंडळ सदस्य या नात्याने विशेषाधिकाराचा भंग करणारी असल्याचे मत आ. देशमुख यांनी सभागृहात मांडले. घरकूल योजनेला केंद्र शासनाच्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. हक्कभंग समितीला हे आहेत अधिकारविधीमंडळात हक्कभंग मान्य झाल्यास तो समितीकडे कारवाईसाठी पाठविला जातो. त्यानंतर ही समिती ज्या सदस्यांच्या हक्कांचे हनन झाले व ज्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा आरोप आहे, त्यांचे म्हणने जाणून घेते. साक्ष नोंदविते. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध तीन प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार समितीला आहेत. सभागृहात बोलावून नापसंती दर्शविणे, मान खाली करुन उभे करणे किंवा कारावासाची शिक्षा सुनावणे, हे ते तीन अधिकार होत. विश्वासार्हतेवरील प्रहार सहन करणार नाहीप्रशासकीय यंत्रणेत अधिकारी मुजोरपणे वागत असतील तर त्यांना कायदेशीररित्या कसा धडा शिकवावा, सभागृहाचे अधिकार काय, यासंबंधिचे बोलके उदाहरण आ. सुनील देशमुख यांनी यानिमित्ताने सादर केले, अशी चर्चा लोकप्रतिनिधींमध्ये होती. तीन वर्षात दाखल झालेला आणि स्वीकारला गेलेला हा पहिला हक्कभंग प्रस्ताव होय.गुडेवारांच्या जाहीर वक्तव्यांची कात्रणे सभागृहातसर्वांसाठी घरे या योजनेच्या मंजुरीचे अधिकार राज्य शासनालाच आहेत, असे जाहिर वक्तव्य गुडेवार यांनी आमदार देशमुखांच्या विधानाच्या उत्तरादाखल केले होते. त्यासंबंधिची बातम्यांची कात्रणे आमदार देशमुखांनी सभागृहात सादर केलीत. अवघ्या सभागृहाने देशमुखांच्या हक्कभंग प्रस्तावाला समर्थन दिले.