शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल स्वाक्षरीचे गौडबंगाल कायम

By admin | Updated: June 23, 2014 00:28 IST

संजय कुलकर्णी , जालना वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यास बीडीओ पदाचा प्रभारी पदभार देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत.

संजय कुलकर्णी , जालनावर्ग-३ च्या कर्मचाऱ्यास बीडीओ पदाचा प्रभारी पदभार देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र असा पदभार दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने प्रभारी नेमणूक रद्द केल्यानंतर व त्या ठिकाणी सहायक बीडीओ रुजू झाल्यानंतरही डिजिटल स्वाक्षरीचे अधिकार प्रशासनाने वर्ग-३ च्या कर्मचाऱ्याकडे दिल्याचा प्रकार घनसावंगीत तालुक्यात उघडकीस आला आहे. बदनापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी योगेश जवादे हे ३० आॅगस्ट २०१३ रोजी बदली झाल्याने तेथून कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा अधिकार तेथेच कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आर.एल. तांगडे यांना देण्यात आला होता. तांगडे यांच्या काळात आॅक्टोबर २०१३ मध्ये ५२ लाखांचा निधी याच डिजिटल स्वाक्षरीद्वारे काढल्याचे प्रकरण गाजले होते. जि.प. सदस्य बाबासाहेब सोनवणे यांनी याबाबतची तक्रार जि.प. अधिकाऱ्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर घनसावंगी पं.स.च्या तत्कालीन बीडीओ वर्षा पवार यांची जालना येथे बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार तांगडे यांच्याकडे देण्याचे आदेश तत्कालीन सीईओ बी. राधाकृष्णन यांनी दिले होते. वास्तविक वर्ग -३ च्या कर्मचाऱ्याकडे गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. सात-आठ महिन्यांच्या काळानंतर गेल्या महिन्यात सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तांगडे यांचा प्रभारी पदभार काढून त्यांना मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले. घनसावंगी पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी हे पद रिक्त आहे. तेथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कुशनेनिवार हे २२ मे रोजी रूजू झाले. मात्र अद्याप त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा शिक्का कार्यालयास प्राप्त झाला नाही. त्यामुळे या डिजिटल स्वाक्षरीचे अधिकार परत तांगडे यांना देण्याची तोंडी सूचना जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. हा अधिकार देण्यावरून प्रशासनामध्ये काही अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. २६९ कामांचे आदेश देणार नाहीसहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कुशनेनिवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सध्या डिजिटल स्वाक्षरीचे अधिकार तांगडे यांच्याकडेच आहेत. माझ्या डिजिटल स्वाक्षरीसंबंधीच्या अधिकाराची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. घनसावंगी तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींअंतर्गत ज्या २६९ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली, तेथे अगोदरच सेल्फवर बरीच कामे आहेत. वास्तविक अगोदर सेल्फवरील कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे २६९ कामांना कामांचे आदेश सध्या देण्याचा प्रश्नच नाही. मग्रारोहयोअंतर्गत मजुरांना काम देणे मात्र बंधनकारक आहे. त्यामुळे मजुरांना कामे दिली जातील, असेही कुशनेनिवार म्हणाले.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घनसावंगी पंचायत समितीच्या वार्षिक बैठकीत २६९ विहिरींना देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता ही नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे या सर्व विहिरींची मान्यता तांगडे यांच्याकडे असलेल्या प्रभारी बीडीओंच्या कार्यकाळातच देण्यात आली. सदस्यांनी केलेल्या आरोपांमधील तथ्य समोर आले नसले तरी गंभीर आरोप झाल्यानंतरही पुन्हा त्याच अधिकाऱ्यांकडे डिजिटल स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आल्याने उलट-सुलट चर्चेला वाव मिळाला आहे.