पाटोदा म़ : अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे गरोदर मातांसाठी आहार कसा असावा या संदर्भात बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले़ या कार्यक्रमाला मातांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़महिला गरोदर राहिल्यानंतर तिने कुठली काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच गरोदरपणात तिचा आहार कसा असावा, कोणते पदार्थ खावेत या संदर्भात बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ़ परळकर यांनी मार्गदर्शन केले़ ते पुढे बोलताना म्हणाले, गरोदर महिलांनी आहार व आराम या दोन गोष्टींचे पहिल्या दिवसापासून नियोजन केले तर जन्माला येणारे बाळ हे सुदृढ व निरोगी असते़ शासनाकडून गरोदर मातांसाठी विशेष आहार पुरविला जातो़ मात्र अनेक वेळा असे काही प्रकार घडले आहेत की गरोदर माता हा आहार सेवनच करीत नाहीत़ हा आहार गरोदर मातांऐवजी पशुधनाना चारला जातो, अशी खंतही परळकर यांनी व्यक्त केली़शासनाकडून दिला जाणारा आहार हा पोषकच असतो़ त्याचे योग्य नियोजन करुन सेवन केल्यास जन्मणारे बाळ निरोगी असते, असेही ते म्हणाले़कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही मार्गदर्शन केले़ यावेळी सरपंच बाळासाहेब देशमुख, बाल विकास अधिकारी जहागीरदार, पंचायत समिती सदस्य अंकुश रेड्डी, मुख्याध्यापक के़ एस़ सरवदे, मोरे, उषा भोसले, संगीता कापसे, शिवकांता टेकाळे, रिता जाधव, रत्नमाला गायकवाड, महामुनी आदींची उपस्थिती होती़ आभार अशोक यादव यांनी मानले़ महिलांची मोठी उपस्थिती होती़ (वार्ताहर)
गरोदर मातांसाठी आहार प्रात्यक्षिक
By admin | Updated: July 27, 2014 01:10 IST