शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या बसेससाठी अखेर डिझेल पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:30 IST

सिडको बसस्थानकातील बसगाड्यांसाठी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत उभारण्यात आलेल्या स्वतंत्र डिझेल पंपाचे सोमवारी (दि. १४) उद्घाटन करण्यात आले.

 औरंगाबाद, दि. 14 -  सिडको बसस्थानकातील बसगाड्यांसाठी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत उभारण्यात आलेल्या स्वतंत्र डिझेल पंपाचे सोमवारी (दि. १४) उद्घाटन करण्यात आले. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षनेनंतर अखेर हा पंप कार्यान्वित झाल्याने यापुढे इंधनासाठी सिडको बसस्थानकाच्या बसगाड्यांना बसणारा ७.४. कि.मी. चा फेरा वाचणार आहे.  चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्वतंत्र डिझेल पंप उभारण्यात आला ; परंतु गेली अनेक महिने परवानगीअभावी पंप सुरू होण्यास विलंब झाला. परिणामी इंधनासाठी सिडको बसस्थानकातील बसगाड्या ७.४ कि. मी. अंतरावर असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात पाठविण्याची वेळ येत होती. त्यामुळे दररोज शेकडो लिटर इंधन ये-जा करण्यातच व्यर्थ जात असून, महामंडळाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. हा प्रकार‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. त्यानंतर हा पंप लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले. अखेर हा पंप आता सुरू झाला आहे. उममहाव्यवस्थापक मधुकर पठारे, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक यू. ए. काटे यांच्या हस्ते सोमवारी डिझेल पंपाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण आदी उपस्थित होते. 

१०० बसेसची सुविधा...डिझेल पंपअभावी सिडको बसस्थानकाच्या शहर बस, ग्रामीण भागातील बसगाड्या इंधनासाठी मध्यवर्ती बसस्थानकात जावे लागत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बसगाड्यांची नाहक भर पडत होती. शिवाय सिडको बसस्थानकातील जालना, तसेच इतर शहरांच्या बसगाड्यांना प्रवासाच्या मार्गावरील पंपांवर इंधन भरावे लागते. अनेकदा इंधन भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वादाचे प्रकार होतात. परंतु आता या डिझेल पंपामुळे १०० बसेसच्या इंधनाची सुविधा होणार आहे.