शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१३६१ किडनीग्रस्तांचे वर्षभरात डायलेसिस

By admin | Updated: January 31, 2016 23:37 IST

संतोष भिसे, हिंगोली मागील तीन वर्षांपासून हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील डायलेसिस सेवा उपलब्ध झाल्याने, जिल्हाभरातील किडनीग्रस्तांची बाहेरगावची वारी चुकली

संतोष भिसे,  हिंगोलीमागील तीन वर्षांपासून हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील डायलेसिस सेवा उपलब्ध झाल्याने, जिल्हाभरातील किडनीग्रस्तांची बाहेरगावची वारी चुकली असून, वर्षभरात १ हजार ३६१ किडनीग्रस्त असलेल्या रुग्णांना नाममात्र शुल्कात लाभ झाला आहे. जिल्ह्यात पाच हजारच्या वर रुग्ण किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच हा अजाार जडलेल्यांनी प्राण गमावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामान्य जनतेत या आजारासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच किडनीच्या आजारावरील उपचार पद्धतीसुद्धा महागडी असल्याने, किडनीग्रस्त व्यक्तीस मृत्यूला कवटाळल्याशिवाय पर्यायच नाही. परंतु ही भीती आता पूर्णत: कमी झालेली आहे. जिल्हा रुग्णालयात २२ जानेवारी २०१४ मध्ये डायलेसीस सेंटर सुरू करण्यात आल्याने अनेकांना जीवदान तर मिळाले. एवढेच नव्हे तर किडनीग्रस्तांची डायलेसीस करण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची फेरी टळली आहे. किडनी निकामी झालेल्या रुग्णांना हिंगोलीतच डायलेसिस सेवेचा लाभ मिळाल्याने आठवड्यातून दोनदा डायलेसिस करणे अगदी सोपे झाले आहे. ही सेवा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने, किडनीग्रस्तांना एक प्रकारची संजीवनीच मिळाली आहे. डायलेसीस विभागात डॉ. संतोष दुर्गकर (किडनीतज्ञ), डॉ. अशोक गिरी, डॉ. अलोक गट्टू, अधिपरिचारिका रत्ना बोरा, दराडे, कपाटे तर डायलेसीस तंत्रज्ञ वाय.आर.पठाण, ए. एस. कदम, एस.एन.गिरी व सेवक खडसे हे रुग्णांना सेवा देत आहेत. किडनीग्रस्तांना आठवड्यातून दोन वेळेस डायलेसीस करणे गरजेचे असल्याने खाजगी रुग्णालयात मात्र तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. हीच सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात अगदी नाममात्र शुल्कात उपलब्ध झाल्याने, त्याचा रुग्णांना चांगलाच उपयोग होत आहे. पूर्वी या सेवेचा लाभ घेण्यासाठी १५० रुपये मोजावे लागत होते. परंतु १ जानेवारीपासून शासन निर्णयाप्रमाणे या सेवेत २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, सेवेचा लाभ घेण्यासाठी आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांना एकही रुपयाचा खर्च करण्याची गरज नाही. पुर्वी जिल्ह्यातील किडनीग्रस्त रुग्णांना नांदेड, परभणी, औरंगाबाद, अकोला, शिर्डी या ठिकाणी जावे लागत होते. परंतु आता ती वेळ टळली असली तरी जिल्हा रुग्णालयातच किडनीग्रस्तांचा डायलेसीस करण्याकडे कल वाढला आहे.